|Thursday, April 18, 2019
You are here: Home » Top News » लंडनमध्ये इमारतीला भीषण आग ; अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

लंडनमध्ये इमारतीला भीषण आग ; अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती 

ऑनलाईन टीम / लंडन :

पश्चिम लंडनच्या लँचेस्टर वेस्ट इस्टेटमध्ये एका बहुमजली इमारतीला भीषण आग लागली. गेनेफेल टॉवर ब्लॉक इमारतीमध्ये ही आग लागली. या आगीत अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

अग्निशमन विभागाच्या माहितीनुसार, 40 फायर इंजिन आणि 200 जवान ही आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करत आहेत. तसेच खोल्या रिकाम्या करण्यासाठी जवान प्रयत्न करत आहेत. या इमारतीमध्ये 120 फ्लॅट आहेत. ही आग दुसऱया मजल्याला लागली. त्यानंतर ही आग 27 व्या मजल्यापर्यंत भडकली. त्यामुळे संपूर्ण इमारत आगीच्या भक्षस्थानी होती. दरम्यान, या आगीत अडकलेल्यांची सुटका करण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

Related posts: