|Thursday, January 17, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » ‘आप’ला अजूनही नाही कुमार यांच्यावर ‘विश्वास’

‘आप’ला अजूनही नाही कुमार यांच्यावर ‘विश्वास’ 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

आम आदमी पक्षाला संस्थापक सदस्य कुमार विश्वास यांच्यावर अजूनही विश्वास नाही का असा प्रश्न बुधवारी सकाळी दिलीप पांडे यांच्या ट्विटनंतर उभा ठाकला आहे. आप नेते असणारे पांडे यांनी विश्वास यांना वसुंधरा राजे यांच्याविरोधात बोलणार नाही का असा प्रश्न ट्विटद्वारे विचारला आहे. पांडे यांच्या या ट्विटमुळे कुमार विश्वास यांना पक्षात बाजूला फेकले जाण्याचा प्रयत्न होत असल्याच्या चर्चेला बळ मिळाले आहे.

भय्या तुम्ही काँग्रेसच्या नेत्यांना खूप शिव्या देता, परंतु राजस्थानात वसुंधरा यांच्याविरोधात बोलणार नाही असे सांगता, असे का असे पांडे यांनी एक ट्विट करत कुमार विश्वास यांना विचारले आहे. या टिप्पणीसह पांडे यांनी एका वृत्तपत्रात प्रकाशित वृत्त देखील जोडले आहे. ज्यात कुमार विश्वास यांनी काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांच्याद्वारे सैन्य अध्यक्षांवर करण्यात आलेल्या टिप्पणीची निंदा केली आहे.कुमार विश्वास यांनी पंजाब आणि गोवा येथे आपच्या पराभवानंतर नेतृत्वावर टीका केली होती आणि दिल्लीतील पालिका निवडणुकीपासून त्यांनी स्वतःला दूर ठेवल्यानंतर आम आदमी पक्षात कुमार विश्वास यांच्याविरोधात नाराजीचा सूर उमटत आहे. निवडणुकीपूर्वी विश्वास यांनी एक चित्रफित जारी करत केजरीवाल समवेत आपवर देखील टिप्पणी केली होती. एवढेच नाही तर दिल्लीचे अनेक आमदार देखील उघडपणे कुमार विश्वास यांच्या समर्थनार्थ उतरले होते. ज्यानंतर आपमध्ये फूट पडत असल्याचे चित्र निर्माण झाले होते. यानंतर कुमार विश्वास यांनी राजस्थानची जबाबदारी सोपवत वादावर पडदा टाकण्यात आला होता.

विश्वास यांच्या विरोधकांनी अमानतुल्ला खान यांच्या माध्यमातून आरोप करण्याचे सत्र चालविले आहे. याद्वारे कुमार यांनी रागाच्या भरात पक्ष सोडावा असा त्यांचा हेतू असल्याचे बोलले जाते. पक्षातील फूट टाळण्यासाठी आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी विश्वास यांना छोटा बंधू ठरवत अमानतुल्ला यांना पक्षातून निलंबित केले होते. परंतु यानंतर देखील खान यांना पक्षाच्या अनेक समित्यांवर नियुक्त करण्यात आले होते.

Related posts: