|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » लिटिल चॅम्पस्’मध्ये हृषिकेश चुरी ग्रँड ज्युरी सदस्य

लिटिल चॅम्पस्’मध्ये हृषिकेश चुरी ग्रँड ज्युरी सदस्य 

मुंबई :

 पार्श्वगायक हृषिकेश चुरी लवकरच ‘सारेगमप लिटिल चॅम्पस्’ या रिऍलिटी शो मध्ये ग्रँड ज्युरी म्हणून झळकणार आहेत. या निवडीबाबत हृषिकेशने समाधान व्यक्त केले असून ‘सारेगमप लिटिल चॅम्पस्’ या कार्यक्रमात ग्रँड ज्युरी सदस्य म्हणून सहभागी होण्यास मी खूप उत्सुक असल्याचे म्हटले आहे. तसेच आपण हय़ा शो ला पहिल्यापासून फॉलो करत असल्याचेही त्याने स्पष्ट केले. या कार्यक्रमात सहभागी होणारी मुले खूपच प्रतिभावान आणि हुषार असल्याचेही त्याने सांगितले. ‘हाऊसफुल-3’ या चित्रपटातील ‘टांग उठाके’ या गाण्यामुळे हृषिकेशला बरीच प्रसिद्धी मिळाली होती. त्यानंतर त्याला विविध लाईव्ह शोमध्ये काम करण्याची संधी मिळाली होती.