|Thursday, April 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » जयसिंगपुरात श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ

जयसिंगपुरात श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ 

प्रतिनिधी/ जयसिंगपूर

येथील डॉ. जे. जे. मगदूम ट्रस्ट व अखिल भारतीय कामदगिरी सेवा संघ चित्रकुटधाम यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ शुक्रवार 16 ते गुरूवार 22 जून अखेर आयोजित करण्यात आल्याची माहिती विजय मगदूम, ऍड. सोनाली मगदूम यांनी दिली.

सर्वांचे जीवन सार्थक होण्याच्या दृष्टीने या ज्ञानयज्ञचे आयोजन करण्यात आले आहे. मगदूम इंजिनिअरींग कॉलेजच्या प्रांगणात होणाऱया कार्यक्रमामध्ये दररोज सायंकाळी 5 ते 8 या वेळेमध्ये आचार्य श्री भगवानदासजी महाराज चित्रकुट मध्यप्रदेश हे कथेचे विवेचन करणार आहेत. त्यानंतर दररोज आरती व प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. भक्तांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.

Related posts: