|Friday, November 16, 2018
You are here: Home » Top News » राष्ट्रपती निवडणूक ; राजनाथसिंह, वेंकय्या नायडू उद्या घेणार सोनिया गांधींची भेट

राष्ट्रपती निवडणूक ; राजनाथसिंह, वेंकय्या नायडू उद्या घेणार सोनिया गांधींची भेट 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह आणि केंदीय शहर विकासमंत्री वेंकय्या नायडू हे उद्या सकाळी अकरा वाजता काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. राष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराबाबत यावेळी चर्चा केली जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पदाचा कार्यकाळ येत्या जुलै महिन्यात पूर्ण होत आहे. त्यामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून राष्ट्रपतिपदाचा उमेदवार लवकरच जाहीर केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच विरोधकांनीही एकत्र येत राष्ट्रपतिपदासाठी उमेदवार देण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर वेंकय्या नायडू आणि राजनाथसिंह हे दोन्ही नेते सोनिया गांधी यांची भेट घेणार असून, याबाबत चर्चा केली जाणार आहे.

Related posts: