|Monday, October 22, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » मणिपूरच्या काही भागाला भूकंपाचा धक्का

मणिपूरच्या काही भागाला भूकंपाचा धक्का 

वृत्तसंस्था /इम्फाळ :

मणिपूरच्या चुराचंदपूर जिल्हय़ाला गुरूवारी सकाळी 6.45 वाजता भूकंपाचा धक्का जाणवला. याची तीव्रता रिश्टर स्केलवर 3 इतकी नोंदण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय भूकंप संशोधन केंद्रातून देण्यात आली. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली 10 किलोमीटरवर होता.

दरम्यान, याआधी हिमाचल प्रदेशमधील चम्बा भागालाही भूकंपाचा धक्का जाणवला. त्याची तीव्रता 3.1 नोंदण्यात आली असून बुधवारी रात्री उशीरा 11.26 वाजता हा भूकंप झाल्याचे सांगण्यात आले.या दोन्ही घटनांमध्ये कोणतीही मनुष्य हानी झाली नसल्याचेही समजते. चम्बा भागासह जम्मू आणि काश्मीरलाही हा धक्का जाणवला.

 

Related posts: