|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » 21 रोजी योग दिनानिमित्त भारत स्वाभिमानतर्फे विविध शिबिरांचे आयोजन

21 रोजी योग दिनानिमित्त भारत स्वाभिमानतर्फे विविध शिबिरांचे आयोजन 

प्रतिनिधी /पणजी :

 पंतजली व भारत स्वाभिमान यांच्यातर्फे 21 जून या योग दिनानिमित्त देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन व शिबीरे आयोजित केली आहेत. या संघटनेच्या वतीने सुमारे 400 योग शिबीरांचे संपूर्ण गोवाभर आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विविध शाळा महाविद्यालये, सरकारी खाती, पंचायती व खाजगी कंपन्या या ठिकार्णीं सकाळपासून संध्याकाळपर्यंत विविध शिबीरांचे आयोजन केले आहे, असे यावेळी भारत स्वाभिमानचे राज्य प्रभारी कमलेश बांदेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

 या शिबिरीसाठी आयुष मंत्रालय निर्देशित पाठय़क्रमांचे प्रशिक्षण गोव्यातील पतंजली परिवारातील सर्व योग शिक्षकांना देण्यात आले आहे. त्यामुळे सर्व गोमंतकीय जनतेला भारत स्वाभिमान संघटनेच्या वतीने आपल्याला हव्या त्या ठिकाणी सहभागी होऊन या शिबिरात भाग घेऊ शकतात. यासाठी भारत स्वाभिमानतर्फे विषेश कार्यक्रमासाठी विषेश योग शिक्षकही पुरविले जाणार आहे. तालुका निहाय योग शिक्षक पुढीलप्रमाणे: डिचोली तालुका संतेश बाराजण (9823524743), सत्तरी तालुका तुळशिदास काणेकर (9922708087), तिसवाडी तालुका शिला काणकोणकर (9370278052), फोंडा तालुका दिनेश नाईक (9823353012), धारबांदोडा सुरेश कोलवेकर (9423063895), वास्को लक्ष्मण मांजरेकर (9921595802), मडगाव कमल फुलारी (9420685982), सांगे पांडुरंग देऊलकर (9850214816), केपे सुहास बोरकर (9881811709), काणकोण भूपेश भिडे (9049921727).

 भारत स्वाभिमानतर्फे सुमारे 150 सरकारी प्राथमिक शाळांना योग शिबिर आयोजित केली जाताते. सुमारे 2 हजार योग शिक्षक यासाठी कार्यरत आहे. यावर्षी आणखी 200 शाळांना योग शिबिर घेतले जाणार आहे. यात अन्य खाजगी शाळाही योग् शिबरी आयोजित करु शकतात. या योग शिबरामुळे विद्यार्थ्यांचा मानसिक तसेच बौद्धिक विकास होत असतो, असे यावेळी कमलेश बांदेकर यांनी सांगितले.

 यावेळी त्यांच्यासोबत युवा भारतचे विश्वास कोरगांवकर, किसान पंचायतचे कमलकांत तारी, मोहन आमशेकर व कमल फुलारी उपस्थित होत्या.