|Thursday, May 24, 2018
You are here: Home » विविधा » जाता पंढरीशी : संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज देहूतून प्रस्थान

जाता पंढरीशी : संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज देहूतून प्रस्थान 

ऑनलाईन टीम / देहू :

देहूतून आज संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. पालखीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे.

विठूरायाच्या भेटीसाठी वारकरी अतूर झाले आहेत आणि आता पांडूरंगाच्या भेटीला जाण्यासाठी भक्त सज्ज झाले आहेत. आज देहूतून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होणार आसून त्यासाठीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे.दरवर्षी तुकाराम महाराजांच्या पालखीत शेकडो वारकरी सहभागी होतात. उन वारा पावसाची पर्वा न करता विठूनमाचा गजर करत वारकरी पंढरीच्या दिशेने रवाना होतात. पालखी सोहळय़ा वारकऱयांची गैरसोय होऊ नये म्हणून खास व्यवस्था ठेवण्यात आली आहे. याशिवाय डॉक्टर आणि अँब्युलन्सचे पथकही सोबत असणार आहे. त्यामुळे आज विठूनामाचा गजरात देहूनगरी दुमदुमून जाईल तर उद्या ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे.

Related posts: