|Thursday, May 24, 2018
You are here: Home » विशेष वृत्त » राष्ट्रपती निवडणुकीसाठी चाहवाल्याने भरला अर्ज !

राष्ट्रपती निवडणुकीसाठी चाहवाल्याने भरला अर्ज ! 

ऑनलाईन टीम / भोपाळ :

काही दिवसांत होणाऱया राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी तयारी करायला सुरूवात केली आहे. राष्ट्रपतीपदाची उमेदवारी कोणाला मिळणार याची उत्सुकता सर्वांना लागली असून यासाठी राजकीय पक्षांच्या देखील भेटीगाठी सुरू झाल्या आहेत. असे असताना ग्वालिअरमधील एका चहावाल्याने राष्ट्रपती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे उमेदवारी अर्ज भरण्याची ही त्याची चौथी वेळ आहे.

अनंद सिंह कुशवाहा असे या चहावाल्याचे नाव असून आतापर्यंत त्यांनी 20 निवडणुका हारल्या आहेत. ग्वालियर येथे राहणाऱया आनंद यांनी 1994 पासून निवडणूक लढण्यास सुरूवात केली. आपण कोणकोणत्या निवडणुका लढलो हेदेखील त्यांच्या चांगलेच लक्षात आहे. त्यांनी उपराष्ट्रपतीपदाची निवडणूकही लढली आहे.‘मी उत्तर प्रदेशातील खासदार आणि आमदारंच्या संपर्कात आहे. याआधी मला गरज हवी होती तितकी मते मिळाली नाहीत पण यावेळी समर्थन मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.त्यामुळे आनंद सिंह यांना निवडणूक लढण्याची हौसच आहे, आता असेच म्हणावे लागेल.

 

Related posts: