|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » क्रिडा » 2032 च्या ऑलिम्पिक यजमान पदासाठी भारताचे प्रयत्न

2032 च्या ऑलिम्पिक यजमान पदासाठी भारताचे प्रयत्न 

वृत्तसंस्था/  चेन्नई

2032  साली होणाऱया ऑलिम्पिक स्पर्धेच्या यजमानपदासाठी भारताचा विचार  केला जाईल असे प्रतिपादन भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष नारायणस्वामी रामचंद्रन यानी केले आहे.

नारायणस्वामी रामचंद्रन यांची तामिळनाडू ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी निवड  झाल्यानंतर ते  पत्रकारांशी बोलताना वरील माहिती दिली. 2032 च्या ऑलिम्पिक स्पर्धा यजमानपदासाठी भारतीय संघ प्रयत्न करेल. दरम्यान यजमान पदासाठी  हा प्राथमिक टप्पा असून त्यानंतर भारताला इतर बाबींबाबत मान्यता मिळविणे जरूरीचे आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेने यासंदर्भात शासनाकडे  लेखी स्वरूपात यजमानपदासाठी आपली योजना सादर करावी लागेल. त्यानंतर शासनाकडून या योजनेला मान्यता मिळणे जरूरीचे आहे. भारताला ऑलिम्पिक या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे यजमान मिळण्यासाठी रामचंदन यांचे प्रयत्न चालू आहेत. 2020 च्या ऑलिम्पिक स्पर्धेचे यजमानपद जपानच्या टोकियो शहराला मिळाले आहे.