|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » राज्य शासनात मंत्री असल्याने अमित शहांना भेटू शकतो

राज्य शासनात मंत्री असल्याने अमित शहांना भेटू शकतो 

प्रतिनिधी/ इस्लामपूर

भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांना भेटण्याबाबत आपली खासदार राजू शेट्टी यांच्या समवेत चर्चा झालेली नाही. मात्र मी राज्य शासनामध्ये काम करीत असल्याने मी भेटू शकतो. शेट्टी हेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा आहेत. त्यामुळे संघटनेत मला कार्यकर्ता व विद्यार्थी म्हणून राहायला आवडेल, अशी कोपर खळी मारतानाच शेतकऱयांच्या कर्जमुक्तीचे श्रेय कुणीही घेण्याचा प्रयत्न केला. आमच्या कर्ज मुक्तीच्या लेकराचे बारसे अनेकजण धुमधडाक्यात घालत आहेत.   पण खरे श्रेय शेतकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच द्यावे लागेल, असे मत कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पत्रकार बैठकीत व्यक्त केले.

दिल्ली येथे पत्रकार बैठकीत खा.शेट्टी यांनी शहा यांच्या भेटीसाठी संघटनेत कुणालाही अधिकार देण्यात आलेले नाहीत, असे वक्तव्य केले आहे. याबाबत छेडले असता, खोत म्हणाले, संघटनेची स्थापना खा.शेट्टी यांनी केली आहे. त्यामुळे निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना आहे. मी एक कार्यकर्ता असल्याचे त्यांनीच सांगितले आहे. मलाही आयुष्यभर कार्यकर्ता म्हणून राहायला आवडेल. माझ्या मते कार्यकर्त्याचा गुण आहे. त्यामुळे काम करताना कुणालाच लहान-मोठा मानत नाही. मी शासनात काम करतो. त्यामुळे मी ही काही कामांसाठी शहा यांना भेटू शकतो. अनेक जण अनेक पक्षांच्या नेत्यांशी भेटत असतात. वेळ असेल व कोणी भेटीला बोलवले तर त्या ठिकाणी जाण्यास कुणी हरकत घेण्याची गरज नाही.

कर्जमुक्ती मुख्यमंत्र्यांमुळेच

सदाभाऊ खोत पुढे म्हणाले, शेतकरी कर्ज मुक्तीचा विषय मी सरकार मध्ये घेल्यानंतर मांडला. बैठकीत ऑक्टोबर मध्ये कर्जमुक्ती देण्याचा निर्णय झाला होता. तोच निर्णय घेण्यात आला. नव्याने या बैठकीत तातडीने कर्ज मिळाले पाहिजे, एवढेच ठरले. पात्र शेतकऱयांना कर्जमुक्ती देण्यासाठी समिती नेमण्याचे ठरले आहे. यापूर्वीच्या सरकारने 7 हजार कोटी रुपयांची कर्जमुक्ती केली होती. यावेळी मात्र ती 25 हजार कोटीं रुपयांपेक्षा होत आहे. ती राजसरकार देणार आहे. आंदोलनामध्ये कोणी काय आरोप केले यापेक्षा मी मुख्यमंत्री फडणवीस यांना मध्यप्रदेश प्रमाणे शेतकऱयांवर लाठी चालवू देऊ नका, अशी विनंती केली होती. काही राजकीय लोकांनी दंगल घडवून मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्याचा डाव खेळला होता. आमच्या कर्ज मुक्तीच्या लेकराचे बारसे अनेकजण धुमधडाक्यात घालत आहेत. त्याचा आम्हाला आनंद आहे. या कर्जमुक्तीमध्ये नियमीत फेड करणाऱयांनाही लाभ होणार आहे. शासन तात्काळ दहा हजार रुपया पर्यंत कर्ज देणार असून ते माफीतून कपात करण्यात येईल. दुध दर वाढी दर वाढी संदर्भात बैठक झाली असून निश्चित दोन दिवसात वाढ होईल.