|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » राममंदिर उभारणीसाठी हिंदूनी संघटित व्हावे

राममंदिर उभारणीसाठी हिंदूनी संघटित व्हावे 

प्रतिनिधी/ फोंडा

अयोध्येत राममंदिराची उभारणी ही प्रत्येक हिंदूची इच्छा आहे. राजकीय पक्षांऐवजी देशातील हिंदू संघटित होऊन राममंदिराची एकमुखी मागणी करावी. राममंदिराच्या  उभारणीसाठी हिंदूंनी संघटीत व्हावे व शक्ती वाढवावी, असे प्रतिपादन भाग्यनगर –  तेलंगण येथील भाजपचे आमदार आणि श्रीराम युवा सेनेचे संस्थापक टी. राजासिंह यांनी केले आहे. रामनाथी-फोंडा येथे अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या काल शुक्रवारी तिसऱया दिवशी झालेल्या सत्रात ‘शासकीय दृष्टप्रवृत्तीच्या विरोधातील कार्य’ या विषयावर ते बोलत होते.

यावेळी हिंदू जनजागृती समितीचे रमेश शिंदे यानी भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान कितीही चांगले असले तरी त्यावर अंमल करणारे राज्यकर्ते असक्षम असतील, तेव्हा लोकशाही अपयशी ठरते. लोकशाहीतील व्यवस्था पालटण्यासाठी समाजाने निद्रिस्त न राहता असामाजिक प्रवृत्तीच्या विरोधात व्यापक लढा उभारण्याची गरज असल्याचे आवाहन केले.

अधिवेशनाच्या तिसऱया सत्रात तेलंगण येथील शिवसेनेचे राज्यप्रमुख टी. एन मुरारी यानी तेलंगण राज्यात सत्ताधारी तेलंगण राष्ट्र समितीकडून अल्पसंख्यकांचे तुष्टिकरण व हिंदूवर होणाऱया अन्यायाची जाणिव करून दिली. पुणे येथील माहिती सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत वारघडे यांनी ‘सनबर्न फेस्टिव्हल’ विरोधात तर बंगाल येथील शास्त्र धर्म प्रचार सभेचे सचिव शिवनारायण सेन यांनी ‘धर्मनिष्ठ अर्थात शास्त्रनिष्ठ बनण्याची आवश्यकता’ या विषयावर मार्गदर्शनपर विचार मांडले.

Related posts: