|Friday, September 21, 2018
You are here: Home » Top News » 19 वर्षीय तरूणाचा जिममध्ये व्यायाम करताना मृत्यू

19 वर्षीय तरूणाचा जिममध्ये व्यायाम करताना मृत्यू 

ऑनलाईन टीम / नाशिक :

जिममध्ये व्यायाम करताना एका 19 वर्षीर तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना नाशिकच्या उत्तमनगर परिसरात घडली आहे. अजिंक्य लोळगे असे मृत युवकाचे नाव असून तो इंजिनियरिंगचा विद्यार्थी होता.

उत्तमनगर परिसरातील बॉडी झोन जिममध्ये काल संध्याकाळी सहा वाजता अजिंक्य व्यायाम करण्यासाठी गेला होता. व्यायाम करताना अचानक चक्कर आल्याने अजिंक्य जागीच कोसळला. त्याला जवळच्या एका खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पण उपचार सुरू होण्यापूर्वी अजिंक्यचा मृत्यू झाला होता. अजिंक्यने तीनच दिवसांपूर्वी जिम जॉईन केली होती. एकुलता एक मुलगा गमावल्याने आई – वडीलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

 

Related posts: