|Monday, November 19, 2018
You are here: Home » Top News » अमित शाह- उद्धव ठाकरे यांच्या भेटीआधीच मुंबईत अमित शाहांचे पोस्टर हटवले

अमित शाह- उद्धव ठाकरे यांच्या भेटीआधीच मुंबईत अमित शाहांचे पोस्टर हटवले 

ऑनलाईन टीम / मुंबई :

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या चर्चेआधीच युतीमधील वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. भाजपाध्यक्षांच्या स्वागतासाठी लावलेले पोस्टर मुंबई महापालिकेने शुक्रवारीच हटवले.

अमित शाह तीन दिवसांच्या मुंबई दौऱयावर आहेत. त्यामुळे मुंबईत ठिकठिकाणी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शाहांच्या स्वागताचे फलक लावले होते. परंतु शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेने पोस्टर उतरवले आहेत. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसंदर्भात अमित शाह रविवारी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. मात्र या भेटीआधीच मनपाने पोस्टर उतरवायला सुरूवात केली आहे. शिवाय अमित शाह यांचे बरंच कार्यक्रम सह्यार्दी अतिथी गृहस मुख्यमंत्र्यांचे वर्षा निवासस्थानावर आहे.

 

Related posts: