|Tuesday, March 20, 2018
You are here: Home » Top News » पुण्यात महिलेवर सामूहिक बलात्कार

पुण्यात महिलेवर सामूहिक बलात्कार 

ऑनलाईन टीम / पुणे :

पुण्यात एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. उरूळी कांचन ते जेजुरी मार्गावर शिदंवणे घाटामध्ये शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडल्याचे समोर आले आहे.

सदर महिला केडगाव परिसरातील असून ती देवदर्शनासाठी नारायणपूर येथे गेली होती. या महिलेला घरी येण्यासाठी रात्री उशीर झाल्याने ती पारगाव चौफुला येथे गाडीची वाट बघत उभी होती. यावेळी फॉर्च्यूनर गाडीतून आलेल्या दोन तरूणांनी महिलेला घरी सोडण्याच्या बहाण्याने गाडीत बसवून घेतले. त्यानंतर या दोघांनी शिंदवणे घाटामध्ये नेऊन महिलेवर बलात्कार केला. त्यानंतर दोघे तिला तिथेच सोडून पसार झाले.

 

Related posts: