|Saturday, August 24, 2019
You are here: Home » क्रिडा » मॅकडोनाल्ड्स-ऑलिम्पिक करार संपुष्टात

मॅकडोनाल्ड्स-ऑलिम्पिक करार संपुष्टात 

वृत्तसंस्था/ लुझान

मॉट्रियाला, 1976 मध्ये झालेल्या ऑलिम्पिकपासून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीशी फूड पार्टनर म्हणून करारबद्ध असलेल्या मॅकडोनाल्ड्स या प्रसिध्द अमेरिकन फास्टफूड कंपनीने हे बंध आता संपुष्टात आणले आहेत. एकूणच जगभरारत आरोग्यविषय सुरु असलेली जागृती, फास्टफूडविषयी व्यक्त होत असलेले विचार यामुळे व्यापाराचे नवे पर्याय ही कंपनी शोधत असल्यामुळे आयओसीशी असलेले दीर्घकालीन संबंध संपुष्टात आणले जात असल्याचे मत क्रीडा क्षेत्रातील तज्ञाकडून व्यक्त होत आहे. आयओसीनेही आपल्या पत्रकात करार संपुष्टात येत असल्याचे म्हंटले आहे. परस्पर सामंजस्याने या करारातून दोघेही मुक्त होत असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. आयओसीने म्हटले आहे की, मॅकडोनाल्ड्स व्यापाराच्या क्षेत्रात अनेक नव्या ठिकाणी पर्याय शोधत असल्यामुळे करारातून मुक्त होण्याचा निर्णय त्यांचा पटण्यासारखा आहे. मॅकडोनाल्ड्स व ऑलिम्पिक असे घट्ट नाते गेली अनेक वर्षे टिकून राहिले होते. आयओसीच्या खजिन्यात मॅकडोनाल्ड्सने लक्षावधी डॉलर्सची भर घातली. आगामी 2020 टोकिओ ऑलिम्पिकमध्ये मॅकडोनाल्ड्सने आपले खाद्यपदार्थ दिसणार नसल्याचे जाहीर केले आहे.