|Thursday, May 24, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » मद्य विक्रेते – स्थानिकांतील संघर्ष टाळण्यासाठी नियमावलीची गरज

मद्य विक्रेते – स्थानिकांतील संघर्ष टाळण्यासाठी नियमावलीची गरज 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

 स्थलांतरीत मद्य विक्रेते व स्थानिक रहिवसी यांच्या मध्ये संघर्ष सुरु आहे. या स्थलांतरीत परवान्यासंदर्भात स्पष्ट धोरण जाहीर करुन, संघर्ष टाळण्यासाठी समन्वयाची नियमावली तयार करावी अशा मागणीचे निवेदन, बी वार्ड अन्याय निवारण कृती समितीच्यावतीने राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश पाटील यांना देण्यात आले.

राष्ट्रीय व राज्य महामार्गाच्या 500 मीटर बाहेर मद्य व्यवसाय स्थलांतरीत करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे परवाने मागितले जात आहेत. स्थलांतरीत होणाऱया ठिकाणांना महिला व स्थानिक नागरीकांचा विरोध होत आहे. यांमुळे मद्य विक्रेते व स्थानिक नागरीक यांच्यामध्ये संघर्ष सुरु आहे.  या संघर्षावर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी, पोलीस व उत्पादन शुल्क यांची संयुक्त बैठक घेऊन नियमावली तयार करावी, अशी मागणी निवदेनाद्वारे समितीने केली आहे. या निवेदनाची दखल घेऊ अशी ग्वाही उत्पादान शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश पाटील यांनी दिली. तसेच जनतेचे स्वास्थ बिघडणार नाही असे आश्वासन त्यांनी दिले.

शिष्टमंडळामध्ये किसन कल्याणकर, रामेश्वर पतकी, राहूल चौधरी, प्रशांत बरगे आदी उपस्थित होते.

Related posts: