|Thursday, May 24, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » दलदलीला आयुक्तच जबाबदार, स्टंटबाजी थांबवा

दलदलीला आयुक्तच जबाबदार, स्टंटबाजी थांबवा 

प्रतिनिधी/ सांगली

शहारातील खड्डय़ाला आणि शामरावनगरमधील रस्त्यावर झालेल्या चिखलाला आयुक्तांचा कारभारच जबाबदार असून त्यांनी चिखलात जावून फोटो काढून म्हणजे स्टंटबाजी असल्याचा आरोप महापौर हारूण शिकलगार यांनी पत्रकारांशी बोलताना केला. कामे अडवून सत्ताधाऱयांना बदनामी करणाऱया आयुक्तांचा योग्य वेळी सभागृहात निर्णय घेऊ असा इशाराही यावेळी त्यांनी दिला. चिखलात फिरून काय साध्य केले आम्ही 30 वर्षे हेच करीत आलोय. असे करण्यापेक्षा विकास कामे करा असाही सल्ला यावेळी त्यांनी दिला.

शहरातील गुंठेवारी भाग असलेल्या शामरावनगरमध्ये पहिल्याच पावसात रस्त्यावर मोठया प्रमाणात चिखल झाल्याने शुक्रवारी संतप्त झालेल्या नागरिकांनी चिखलात ठिय्या आंदोलन केले. याशिवाय आयुक्त तसेच नगरसेवकांनाही येथे बोलावून चिखलातून फिरविले. या निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत बोलताना महापौर हारूण शिकलगार म्हणाले, आयुक्तांची ही निव्वळ स्टंटबाजी आहे. गेल्या वर्षभरापासुन आम्ह त्यांना या भागातील कामे करण्यासाठी मागे लागलो आहे. जानेवारीमध्ये कामांचे टेंडर निघाले आहे. पाच-सहा महिने झाले तरी कामे सुरू झाली नाहीत. त्यांनी ही कामे केली असती तर आज ही परिस्थिती निर्माण झाली नसती. नागरिकांना नागरी सोयी सुविधा दिल्याच पाहिजेत त्या आम्ही देण्यास प्रयत्न करीत आहोत मात्र ढिम्म प्रशासनामुळे अशाप्रकारे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. डेनेज, घरकुल, तसेच रस्ते या कामे रेंगाळण्याला आयुक्तच जबाबदार असून त्यांनी परस्पर मुदतवाढ दिलीच शिवाय लेखाधिकारी यांना पुढे करून कारभार सुरू केला आहे.

पावसाळय़ापूर्वी कामे मार्गी लावण्याबाबत नगरसेवकांसह पदाधिकारी म्हणून आम्ही पाठपुरावा केला मात्र प्रशासनाला याचे गांभीर्य आले नाही. मंजूर कामे सहा महिने सुरू होत नाहीत यापेक्षा दुर्दैव काय आहे असा सवाल करून महापौर शिकलगार म्हणाले, आयुक्तांनी मागच्या पावसाळय़ातही शामरावनगरसह गुंठेवारी भागात फिरती केली होती. यावेळीही अशाच प्रकारे आश्वासने दिली, मात्र एकही काम केले नाही. शामरावनगर ठेकेदाराने दोन वर्षे काम पूर्ण केले नाही. त्याला काळय़ा यादीत टाकण्याची मागणी केली मात्र त्याला पुन्हा कामे देण्यात आली. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आज शहरात ही परिस्थिती निर्माण झाली असून आता स्टंटबाजी कशाला करता असा सवाल करून ते म्हणाले, महापालिकेसमोरील रस्त्यावरील खड्डे मुजविण्यास सांगितले मात्र ते मुजविले नाही.

 सत्ताधाऱयांना कमी लेखून जनतेने लाखोली वाहली, असे प्रशासनाला वाटते. चप्पल काढून चिखलात जाण्याचा धंदा गेल्या 30 वर्षापासून आम्ही करीत आहे हा आम्हाला नवीन नाही. जनतेला सोयी सुविधा दिल्या जातील आयुक्त असो नसो आम्ही मुरूम टाकू, पाण्याची सोय करू रस्ते या पावसाळय़ातील सुविधा देण्यास कटिबद्ध आहोत. यापुढे आयुक्तांची अरेरावी चालू देणार नाही. शामरावनगरमधील चार ते पाच रस्त्यांचे कामे मार्गी लावली. आणखी काही कामे सुरू आहेत. सुंदरनगरमध्ये सहा महिन्यापासून पाण्याची टंचाई सुरू आहे. येथे थांबून पाणीपुरवठा सुरळीत केला. आता गुलाब कॉलनी, विनायकनगर, प्रगती कॉलनी येथील रस्त्यावरील चरी मुजवून मुरमीकरण केले जाईल. पावसामुळे या कामाला थोडा अडथळा आला असला तरी ही कामे तातडीने मार्गी लावली जातील असेही यावेळी शिकलगार यांनी सांगितले.

गाळ्यांच्या प्रश्न सामोपचाने सोडवा 

गाळेधारक व्यापारी संघर्ष समितीची मागणी; आयुक्तांची भेट  

17सोलापूर07

सोलापूर–

   शहरातील मेजर व मिनी गाळ्यांचा फेर लिलाव करण्याचा प्रशासनाने प्रस्ताव आणल्याने हा प्रश्न गाळेधारकांना विश्वासात घेऊन सामोपचाराने सोडवा . अनेकांची रोजीरोटी बंद होईल असा निर्णय  न घेता प्रशासनाने विश्वस्त घेऊन निर्णय घ्यावा या मागणीसाठी  मनपा गाळेधारक व्यापारी संघर्ष समितीच्या सर्व सदस्यांनी महापालिकेत धाव घेतली. हा फेरलिलाव बंद करावा अशी मागणी केली . 

    सोलापूर शहरातील 601 गाळ्यांचा फेरलिलावाचा प्रश्न अनेक वर्षांपासून रेंगाळलेला आहे. महापालिका प्रशासनाने  मेजर व मिनी गाळ्यांचा फेरलिलाव करण्याचा प्रस्ताव दिला असून हा सर्वसाधारण सभेच्या कोर्टात यावर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे. दरम्यान हा फेरलिलाव रद्द करावा व्यापायांना विश्वासात घेऊन शहरातील गाळेधारकांचा विचार करावा. आजपर्यंत व्यापायांनी मनपा प्रशासनाला सहकार्य केले आहे.

  महापालिकेचे उत्पन्न वाढावे  व्यापायांचीही इच्छा आहे. पण सध्या चालू व्यवसाय असणाया व्यापायांना या निर्णयाने नुकसान होणार आहे. त्यांच्या रोजीरोटीवर संक्रांत येणार असल्याचे सांगितले. गेल्या दोन वर्षांपासून महापालिकेच्या मालकीच्या प्रमुख गाळ्यांच्या प्रश्न प्रलंबित आहे. यामुळे महापालिकेच्या मिळणार्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागत आहे. यासंदर्भात एक बैठक घेऊन महिनाभरात यावर निर्णय घेऊ असे महापालिकेचे सभागृहनेते सुरेश पाटील यांनी सांगितले होते. महापालिका पदाधिकारी व्यापायांच्या बाजूने असून उत्पन्न वाढीसाठी भाडेवाढ महत्वाची आहे त्यामळे या विषयावर तोडगा काढू अशी भूमिका त्यांनी घेतली होती. 

    महापालिकेच्या प्रमुख गाळ्यांच्या प्रलंबित प्रश्नावर अनेकवेळा चर्चा झाली आहे. गत वर्षात या गाळ्यांपोटी येणारे उत्पन्न महापालिकेला मिळाले नाही. यामुळे शहरातील विकासकामांवर परिणाम होत आहे. या गाळ्यांचा लिलाव न करता आहे, त्यांनाच हे गाळे अधिक डिपॉझिट घेऊन चालू बाजारभावाप्रमाणे या गाळ्यांकडून भाडे आकारण्यात यावे, यामुळे यावर हा तोडगा होईल अशी राजकीय भूमिका असली तरी सर्वाधिकार व अंतिम निर्णय सर्वसाधारण सभेत होणार आहे.

     महापालिकेच्या विविध भागातील प्रमुख गाळ्यांचा प्रश्न मार्गी लागला तर यातून सुमारे 25 ते 30 कोटींचे उत्पन्न वाढणार आहे. तसेच शहरातील अनेक मिनी गाळे हे हातावर पोट असलेल्या धारकांकडेच आहेत. त्यांच्याकडूनही बाजारभावाप्रमाणे भाडे आकारल्यास त्या माध्यमातूनही महापालिकेला कोटय़वधींचे उत्पन्न मिळणार आहे. 

Related posts: