|Thursday, May 24, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » ‘गुरुकुल’ हल्ल्याप्रकरणी जांभळेस अटक

‘गुरुकुल’ हल्ल्याप्रकरणी जांभळेस अटक 

प्रतिनिधी/ सातारा

शाहूनगर येथील गुरुकुल शाळेवर तीन महिन्यापूर्वी हल्ला करून दरोडा टाकण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी फरारी असलेला आरोपी योगेश उर्फ आप्पा जांभळे याला सातारा शहर पोलिसांनी प्रतिनिधी/ सातारा
शाहूनगर येथील गुरुकुल शाळेवर तीन महिन्यापूर्वी हल्ला करून दरोडा टाकण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी फरारी असलेला आरोपी योगेश उर्फ आप्पा जांभळे याला सातारा शहर पोलिसांनी शनिवारी दुपारी 4 वाजता पोवई नाका परिसरात वरिष्ठ पोलीस निरीक्षक तारणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार राजू शेख व पंकज ढोणे यांनी अटक केली. या घटनेत एकूण 40 आरोपी असून यापैकी 12 जणांची नावे सीसीटीव्हीमुळे निष्पन्न झाली होती. त्यापैकी 6 जणांना यापूर्वीच अटक करण्यात आली असून अन्य तिघांनी अटकपूर्व जामीन घेतला होता.
याबाबत अधिक माहिती अशी, शाहूनगर येथील गुरुकुल शाळेवर 6 मार्च रोजी हल्ला करून दरोडा टाकण्याचा प्रयत्न 30 ते 40 जणांनी केला होता. यामध्ये मुख्य आरोपी सचिन गरगटे रा. कोल्हापूर याने काही मुले एकत्र करून हा हल्ला केला होता. परंतु सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे सर्व आरोपी कैद झाले असल्याने त्यामुळे पोलिसांनी यातील 6 जणांना यापूर्वीच अटक केली आहे. त्यांना न्यायालयासमोर हजार केले असता त्यांना 40 दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते. तर मुख्य आरोपी गरगटे व अन्य दोघांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. तो अर्ज न्यायालयाने मंजूर केल्यामुळे या तिघांना अटक झाली नव्हती. तर नावे निष्पन्न झाल्या पैकी 6 जण फरारी होते. त्यामधील आरोपी जांभळेला साताऱया अटक केली आहे.
शनिवारी दुपारी 4 वाजता पोवई नाका परिसरात वरिष्ठ पोलीस निरीक्षक तारणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार राजू शेख व पंकज ढोणे यांनी अटक केली. या घटनेत एकूण 40 आरोपी असून यापैकी 12 जणांची नावे सीसीटीव्हीमुळे निष्पन्न झाली होती. त्यापैकी 6 जणांना यापूर्वीच अटक करण्यात आली असून अन्य तिघांनी अटकपूर्व जामीन घेतला होता. 

Related posts: