|Thursday, May 24, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » कर्माशिवाय मनुष्य महान होवू शकत नाही

कर्माशिवाय मनुष्य महान होवू शकत नाही 

प्रतिनिधी / बेळगाव

काही जण जन्मापासूनच भाग्यवान असतात. हे खरे असले तरी ते महान होवू शकत नाहीत. कारण कर्माशिवाय मनुष्य महान होणे अवघड आहे. त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा असणे गरजेचे आहे. तेंव्हाच महान कर्म घडू शकते. तेंव्हा सतत कामात रहा, अहंकार सोडा, निश्चित तुम्ही महान व्हाल, असे उद्गार सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश मोहन शांतगौडर यांनी काढले.

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्त झाल्यानंतर बेळगाव बार असोसिएशनच्यावतीने आयोजित केलेल्या सत्काराप्रसंगी ते बोलत होते. जेएनएमसी येथील शतकोत्सव सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश एस. अब्दुलनजीर यांचाही सत्कार करण्यात आला. उत्तर कर्नाटकातील एकाचवेळी या दोघा न्यायाधीशांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती झाल्यामुळे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

न्यायाधीश मोहन शांतगौडर म्हणाले, आपण समाजाला चांगले दिले तर निश्चितच आम्हाला चांगले फळ मिळते. कोणालाही तुच्छ दृष्टिने पाहू नये. कारण सत्य हे कायम राहते. त्यामुळे सत्याची कास धरतच काम करणे महत्त्वाचे आहे. अलिकडे इंग्रजीचे फॅड वाढले आहे. पण आम्ही दोघेही न्यायाधीश मातृभाषेतून शिक्षण घेतले आणि आज या पदाला येवून पोहोचलो आहे, असेही त्यांनी सांगितले.

मुलांना आपण कसे शिक्षण देतो त्याचबरोबर त्यांना देण्यात येणारे संस्कारही महत्त्वाचे असतात. चुकीचे मार्गदर्शन दिल्यास त्याचा फटका बसतो. तेंव्हा मुलांना चांगले काय आहे आणि वाईट काय आहे? याची जाणीव करुन देणे महत्त्वाचे आहे. पैसा हा महत्त्वाचा नाही. तर काम हेच महत्त्वाचे आहे. बऱयाचवेळा श्रीमंत किंवा उद्योजकांचे खटले ज्ये÷ वकील न्यायालयात स्वतः उपस्थित राहून युक्तीवाद करतात. पण तोच जर गरिबाचा असेल तर एखाद्या ज्युनिअर वकिलाकडे देवून चालविण्यास सांगतात. पण हे योग्य नाही. प्रत्येक पक्षकार हा महत्त्वाचा आहे. तेंव्हा त्या दृष्टिनेच तुम्ही काम करा, असेही त्यांनी सांगितले.

न्यायाधीश एस. अब्दुलनजीर यांनी आपल्या मंगळुरी कन्नड भाषेतून मार्गदर्शन केले. आज मी या पदाला येवून पोहोचलो हे ईश्वराबरोबरच आई, वडील यांचा आशीर्वाद आहे. माणसाचे शिक्षण महत्त्वाचे नाही तर अनुभव हा महत्त्वाचा आहे. मी ग्रामीण भागातून शिक्षण घेवून आज या पदाला येवून पोहोचलो आहे. माणसाचे अंत:करण शुद्ध असेल तर निश्चितच यश मिळू शकते. प्रत्येकाने हृदयापासूनच कार्य करणे गरजेचे आहे. वकिलांचा युक्तीवाद पाहून न्याय देण्यापेक्षा जो पक्षकार आहे तो साक्ष देतो. त्या साक्षमधून त्याचा अनुभव घेणे गरजेचे आहे. त्यानंतरच न्याय देणे गरजेचे आहे. कारण अनुभव हाच माणसाला चांगले कर्म करण्यास शिकवतो, असेही त्यांनी सांगितले.

कोणीही श्रीमंत आहे म्हणून तो महान ठरत नाही तर गरिबीतून आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यासारख्या कर्तृत्ववान महापुरुषही महान ठरला. तेंव्हा आपले कर्म हेच महान आहे. त्यासाठी कर्म चांगले करा, असे त्यांनी सांगितले. यावेळी बसवेश्वरांचे तत्त्वही त्यांनी सांगितले.

उपलोकायुक्त सुभाष आडी म्हणाले, हे दोघेही उत्तर कर्नाटकाचे हिरे आहेत. निश्चितच ते संपूर्ण देशात कर्नाटकाचे नाव उज्ज्वल करतील. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होणे सोपे नाही तर त्याला मोठा त्याग करावा लागतो. त्यानंतरच हे पद मिळते. न्यायाधीश होण्याला वय लागत नाही तर त्याला अनुभव लागतो. तसा या दोघा न्यायाधीशांनी अनुभव घेवूनच ही मजल मारली आहे, हे खरोखर कौतुकास्पद असून उत्तर कर्नाटकाच्या शिरपेचात हा मानाचा तुरा असल्याचे त्यांनी सांगितले.

निवृत्त न्यायाधीश आणि कर्नाटक राज्य पोलीस तक्रार प्राधिकारचे चेअरमन ए. एस. पाच्छापुरे म्हणाले, या दोघा न्यायाधीशांनी मोठे काम केले आहे. पण त्यांना आम्ही काहीच काम केले नाही, असे वाटते. कारण त्यांनी गरिबीतूनच ही झेप घेतली आहे. न्यायाधीश होण्यासाठी नव्या उमद्या रक्ताची गरज आहे, असे म्हटले जाते. पण रक्ताची गरज नसून अनुभवाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जयंत पटेल यांनीही सर्वोच्च न्यायालयाचे वकील बनण्यासाठी किती कष्ट काढावे लागतात, याची माहिती वकिलांसमोर मांडली. प्रारंभी स्वागतगीत झाले. त्यानंतर बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष एस. एस. किवडसण्णावर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. त्यानंतर माजी अध्यक्ष ए. जी. मुळवाडमठ यांनी प्रास्ताविक केले. कर्नाटक बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ए. आर. पाटील यांनी न्यायाधीशांचा परिचय करुन दिला. यावेळी बेळगाव बार असोसिएशनबरोबरच जिह्यातील विविध तालुक्मयातील बार असोसिएशनच्यावतीने या दोघा न्यायाधीशांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गदा भेटवस्तू म्हणून देण्यात आली.

या कार्यक्रमाला मुख्य जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. जे. सतीशसिंग, बार असोसिएशनचे उपाध्यक्ष मुरगेंद्रगौडा पाटील, हनुमंत कोंगाली, जनरल सेपेटरी प्रवीण अगसगी, कर्नाटक बार असोसिएशनचे सदस्य के. बी. पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमाला मोठय़ा संख्येने वकील उपस्थित होते..

Related posts: