|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » सिंधूताई सपकाळना महिलारत्न पुरस्कार

सिंधूताई सपकाळना महिलारत्न पुरस्कार 

प्रतिनिधी/ बेळगाव

शिवबसवनगर येथील नागनूर रुद्राक्षीमठाच्यावतीने ज्ये÷ सामाजिक कार्यकर्त्या आणि अनेक अनाथ मुलांची माता ठरलेल्या सिंधूताई सपकाळ यांना महिलारत्न पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार आहे. बुधवार दि. 21 रोजी सकाळी 10.30 वाजता मठाच्या एस.जी.बाळेकुंद्री इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरींग ऍण्ड टेक्नॉलॉजीच्या सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.

ज्ये÷ सामाजिक कार्यकर्त्या पद्मावती षण्मुखाप्पा अंगडी यांच्या स्मरणार्थ नागनूर मठाच्यावतीने या दिवशी महिला संगम या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात उल्लेखनिय कार्य करणाऱया दोन महिला कार्यकर्त्यांना महिलारत्न पुरस्कार दिला जाणार आहे. बेंगळुर येथील ज्ये÷ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. विजयालक्ष्मी बाळेकुंद्री याही या पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत.

विजापूर येथील ज्ञानयोगाश्रमाचे सिध्देश्वर स्वामीजी यांच्या सानिध्यात हा कार्यक्रम होणार आहे. अध्यक्षस्थानी  नागनूर रुद्राक्षीमठाचे म.नि.प्र. डॉ. सिध्दराम स्वामीजी असतील. उद्घाटन घोडगेरी शिवानंद मठाचे मल्लय्या स्वामीजी यांच्या हस्ते होणार आहे. बेळगाव शहर परिसर, जिल्हा तसेच राज्यभरातील विविध क्षेत्रात कार्यरत महिलांना या कार्यक्रमात आमंत्रीत करण्यात आले आहे.