|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » Top News » मानवी ढाल बचावाची आदर्श पद्धत असू शकत नाही : लष्करप्रमुख

मानवी ढाल बचावाची आदर्श पद्धत असू शकत नाही : लष्करप्रमुख 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

दगडफेक करणाऱयांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी मानवी ढाल ही काही आदर्श पद्धत असू शकत नाही, असे लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी सांगितले. तसेच लष्कराने कायमच मानवाधिकारांचा सन्मान केला असून मानवाधिकारांचे संरक्षण केले आहे, असेही ते म्हणाले.

सुरक्षा दलांवर दगडफेक करणाऱयांचा मुकाबला कसा करणार असा सवाल रावत यांना करण्यात आला होता. या प्रश्नाला उत्तर देताना मानवी ढालीचा वापर आदर्श पर्याय असू शकत नाही, असे स्पष्ट केले. यापूर्वी लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी मेजर गोगोई यांच्या मानवी ढाल करण्याच्या कृत्याचे समर्थन केले होते. तसेच लष्करप्रमुखांनी यासाठी त्यांचा सन्मानदेखील केला होता. गोगोई यांच्यामुळे मोठी दुर्घटना टळली, असल्याचे रावत म्हणाले होते. त्यानंतर आता लष्करप्रमुखांनी मानवी ढाल ही बचावाची आदर्श पद्धत असू शकत नाही, असे स्पष्ट केले.