|Thursday, May 24, 2018
You are here: Home » leadingnews » राष्ट्रपतिपदासाठी एनडीएकडून रामनाथ कोविंद यांना उमेदवारी

राष्ट्रपतिपदासाठी एनडीएकडून रामनाथ कोविंद यांना उमेदवारी 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

राष्ट्रपतिपदासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. रामनाथ कोविंद यांचे नाव संसदीय बोर्डाच्या बैठकीत निश्चित करण्यात आल्याची माहिती भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी दिली.

दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पदाचा कार्यकाळ जुलै महिन्यात पूर्ण होत आहे. त्यामुळे राष्ट्रपतिपदाच्या उमेदवारीवरुन एनडीएसह विरोधी पक्षांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होत्या. एनडीएचे उमेदवार म्हणून भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांची नावं आघाडीवर होती. आज झालेल्या भाजपच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत राष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराबाबत चर्चा झाली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यात झालेल्या चर्चेनंतर रामनाथ कोविंद यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. कोविंद हे 23 जूनला उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, कोविंद यांचे नाव राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार म्हणून निश्चित करण्यात आले आहे. याबाबतची माहिती एनडीएतील सर्व घटक पक्षांना देण्यात आली आहे. घटकपक्षांचे देखील कोविंद यांच्या नावावर एकमत होईल, असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला.

कोण आहेत रामनाथ कोविंद ?

कोविंद हे मूळचे उत्तर प्रदेशातील कानपूर जिह्यातील असून, ते दलित प्रवर्गातील नेते आहेत. त्यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1945 साली झाला. कोविंद हे व्यवसायाने वकील आहेत. त्यांनी उच्च न्यायालयात वकीली केली. ते 12 वर्षे राज्यसभेत आहेत. त्यांनी उत्तरप्रदेशात भाजपचे महासचिव म्हणून काम पाहिले.

 

 

Related posts: