|Wednesday, February 20, 2019
You are here: Home » मनोरंजन » निपुण धर्माधिकारी सांगणार ‘बापजन्मा’ची कथा

निपुण धर्माधिकारी सांगणार ‘बापजन्मा’ची कथा 

युवा आणि प्रतिभाशाली दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी आणि ‘एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट’ प्रस्तुत मराठी चित्रपट ‘बापजन्म’ 15 सप्टेंबर 2017 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटचे संजय छाब्रिया, सुमतिलाल शाह आणि सिक्स्टीन बाय सिक्स्टी फोर प्रोडक्शन्सतर्पे ही घोषणा करण्यात आली.

बापजन्मची प्रस्तुती मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, शिक्षणाच्या आयचा घो, हापूस, आयडियाची कल्पना, तुकाराम, आजचा दिवस माझा, हॅप्पी जर्नी, कॉफी आणि बरेच काही, टाईम प्लीज, मुंबई-पुणे-मुंबई 2 यांसारखे अनेक गाजलेले चित्रपट देणाऱया एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटची आहे. निपुण धर्माधिकारी हे आज घराघरात पोहोचलेले नाव आहे. मराठी कास्टिंग काऊच या अत्यंत नाविन्यपूर्ण आणि वेगळय़ा संकल्पनेच्या माध्यमातून ते युवकांमध्येही लोकप्रिय झाले आहेत. त्यांचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. त्यांनी 2009 मध्ये नाटक कंपनी या संस्थेची स्थापना केली आणि त्या माध्यमातून शतकांपूर्वी रंगभूमीवर आलेल्या संगीत नाटकांचे पुनर्रुजीवन केले. त्या माध्यमातून शेक्सपियरच्या परंपरेलाही उजाळा दिला गेला. या नाटकांची मराठी रंगभूमीवर तर वाहवा झालीच. पण, त्याचबरोबर अमेरिकेतील आणि अगदी दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या भारत रंगमहोत्सवातही त्यांना मानाचे स्थान मिळाले. भविष्याचा वेध घेणारा दिग्दर्शक म्हणून निपुण यांची ख्याती आहेच. पण, त्याचबरोबर त्यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये कलाकार आणि लेखक म्हणूनही आपला ठसा उमटवला आहे. त्यात नौटंकी साला (2013) आणि हरीश्चंद्राची पॅक्टरी (2009) यांचा समावेश आहे. बापजन्म हा शब्द मराठी जनमानसात लोकप्रिय आहे. निपुण यांचे दिग्दर्शन असलेल्या बापजन्म या आगामी चित्रपटाने रसिकांची उत्कंठा ताणली गेली आहे.

Related posts: