|Thursday, May 24, 2018
You are here: Home » क्रिडा » दुहेरी महायुद्धात ‘हसू आणि आसू’!

दुहेरी महायुद्धात ‘हसू आणि आसू’! 

हॉकीत भारताचा 7-1 फरकाने एकतर्फी विजय, क्रिकेटमध्ये मात्र एककलमी निराशा

वृत्तसंस्था/ लंडन

भारत विरुद्ध पाकिस्तान या कट्टर, पारंपरिक प्रतिस्पर्ध्यात लंडनमध्ये क्रीडा विश्वातील दुहेरी महायुद्ध रंगले आणि त्यात दोन्ही देशांना समसमान यशापयश प्राप्त झाले. एकीकडे, वर्ल्ड हॉकी लीगमध्ये भारताने पाकिस्तानचा 7-1 अशा फरकाने एकतर्फी धुव्वा उडवला तर दुसरीकडे, आयसीसी चॅम्पियन्स चषक स्पर्धेच्या फायनलमध्ये पाकिस्तानने भारताचा तब्बल 180 धावांनी एककलमी फडशा पाडत जणू हॉकीतील पराभवाचा वचपा काढला. या समसमान यशापयशामुळे दोन्ही संघांची स्थिती ‘कभी खुशी, कभी गम’ अशीच राहिली.

प्रारंभी, रविवारी सायंकाळी 6.30 वाजता हॉकीच्या महायुद्धात भारतीय संघाने पाकिस्तानचा एककलमी धुव्वा उडवत वर्ल्ड हॉकी लीग उपांत्य स्पर्धेतील ब गटात सलग तिसरा विजय नोंदवला. ड्रगफ्लिकर हरमनप्रीत सिंग (13 व 33 वे मिनिट), तलविंदर सिंग (21 व 24 वे मिनिट), आकाशदीप सिंग (47 व 59 वे मिनिट) व प्रदीप मोर (49 वे मिनिट) यांनी भारतीय संघातर्फे गोल केले. पाकिस्तानतर्फे मोहम्मद उमर भुट्टाने 57 व्या मिनिटाला एकमेव गोल केला.

दुसरीकडे, ओव्हलवर भारतीय क्रिकेट संघाने मात्र कोटय़वधी क्रिकेटप्रेमींची घोर निराशा केली. शतकवीर फकहर झामन (106 चेंडूत 114), अझहर अली (59), बाबर आझम (46) यांच्या फलंदाजीमुळे भारताने 4 बाद 338 धावांचा डोंगर रचला तर प्रत्युत्तरात विराटसेनेला सर्वबाद 158 धावांमध्येच गारद होण्याची नामुष्की स्वीकारावी लागली. मोहम्मद आमीर (3/16) व हसन अली (3/19) यांनी भारताच्या डावाला खऱया अर्थाने सुरुंग लावत त्यांचे विजयाचे सारे मनसुबे अक्षरशः धुळीस मिळवले.

Related posts: