|Thursday, May 24, 2018
You are here: Home » leadingnews » मतांच्या राजकारणासाठी राष्ट्रपतीपदाची उमेदवारी नको : उद्धव ठाकरे

मतांच्या राजकारणासाठी राष्ट्रपतीपदाची उमेदवारी नको : उद्धव ठाकरे 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मतांच्या राजकारणासाठी राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराची निवड करणे योग्य नाही, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीबाबत आज उघड नाराजी व्यक्त केली.

एनडीएकडून रामनाथ कोविंद यांचे नाव राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आले आहे. त्याबाबत बोलताना ते म्हणाले, दलित मतांचा विचार करून राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराची निवड होणे अयोग्य आहे. सर्वांचे हित पाहणारा उमेदवार असायला हवा. देशाचा राष्ट्रपती हिंदू का नको? मोहन भागवत, स्वामिनाथन यांच्यापैकी एखादा राष्ट्रपती का होऊ नये, असा सवाल त्यांनी केला.

मध्यावधीसाठी कधीही तयार

मध्यावधी निवडणुकांची धमकी आम्हाला देऊ नका. त्यासाठी आम्ही कधीही तयार आहोत. तुम्हीच ती हिंमत दाखवा. निवडणूक लादलीच, तर शिवसैनिक वणव्यासारखा पेटून या निवडणुकीला सामोरा जाईल, असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

कानडी अत्याचाराबाबत का बोलत नाही

सीमाभाग हा कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र असून, तेथील मराठी बांधवांवर कर्नाटककडून अत्याचार होत आहेत. मात्र, कानडी अत्याचाराबाबत सरकार काहीच बोलत नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

 

Related posts: