|Wednesday, December 19, 2018
You are here: Home » उद्योग » विक्रीत टाटाने टाकले होंडाला मागे

विक्रीत टाटाने टाकले होंडाला मागे 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

देशातील ऑटोमोबाईल क्षेत्रात सतत पीछेहात होणाऱया टाटा मोटर्स या देशी कंपनीने बाजारात पुन्हा वरचढ होण्यास प्रारंभ केला आहे. बाजारात पुन्हा मालकी मिळविण्यासाठी कंपनीला नवीन मॉडेल्सची मदत मिळत आहवे. मे महिन्यात नवीन कारच्या विक्रीच्या बाबतीत टाटा मोटर्सने होंडा कार्सला मागे टाकले आहे. टाटा मोटर्सकडून गेल्या काही महिन्यात कॉम्पॅक्ट प्रकारातील टियागो, कॉम्पॅक्ट सेडान टिगोर आणि एसयूव्ही हेक्सा दाखल केली आहे. या नवीन कारमुळे टाटा मोटर्सच्या मे महिन्यातील विक्रीमध्ये वर्षाच्या आधारे 32 टक्क्यांनी वाढ झाली. गेल्या महिन्यात कंपनीने 12,499 युनिट्सची विक्री केली.

मेमध्ये टाटा मोटर्सच्या विक्री 32.18 टक्के आणि होंडा कार्स इंडियाच्या विक्रीत वर्षाच्या आधारे 13.30 टक्क्यांनी वाढ झाली. होंडाने 11,278 युनिट्सची विकी केला. एप्रिलमध्ये हा आकडा 14,480 युनिट्स होता. नव्याने दाखल केलेल्या होंडा सिटी आणि कॉम्पॅक्ट एसयूव्ही डब्ल्यूआर-व्ही कारला चांगला प्रतिसाद मिळत आहे असे कंपनीने म्हटले. दोन्ही कारचे दोन महिन्याची प्रतिक्षायादी असून सिटीची नोंदणी 33 हजार आणि एब्ल्यूआर-व्ही नोंदणी 18 हजार आहे.

मे महिन्यात टाटा मोटर्सच्या टियागोची विक्री 4901, टिगोर 2344 आणि हेक्सा 727 युनिट्स होती.

मे महिन्यातील विक्री…

मे महिन्यात देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकीची विक्री 1.30 लाख युनिट्स होती. कंपनीच्या विक्रीत 15 टक्यांनी वाढ झाली, तर प्रतिस्पर्धी हय़ुंदाईचा विक्रीत 1.59 टक्क्यांनी वाढ होत 42,007 युनिट्सवर पोहोचली.

Related posts: