|Thursday, May 24, 2018
You are here: Home » उद्योग » जीएसटीमुळे दोन्ही निर्देशांकात पुन्हा तेजी

जीएसटीमुळे दोन्ही निर्देशांकात पुन्हा तेजी 

बीएसईचा सेन्सेक्स 255, एनएसईचा निफ्टी 70 अंशाने वधारले

वृत्तसंस्था/ मुंबई

सप्ताहाच्या प्रारंभीच भांडवली बाजारात चांगलीच सुरुवात झाली होती. बाजार तेजीने उघडला होता आणि दुपारच्या सत्रात जोरदार खरेदी झाली. यामुळे निफ्टी 9,650 च्या पार जाण्यास मदत झाली. दिवसातील व्यवहारादरम्यान सेन्सेक्स 31,362 आणि निफ्टी 9,673 वर पोहोचण्यास  यशस्वी झाले होते. जीएसटी परिषदेने व्यापाऱयांना विवरणपत्र देण्यासाठी दोन महिन्यांची सवलत दिल्याने बाजारात तेजी आली.

बीएसईचा सेन्सेक्स 255 अंशाने मजबूत होत 31,311 वर बंद झाला. एनएसईचा निफ्टी 70 अंशाने वधारत 9,658 वर बंद झाला.

मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागात मात्र सुस्ती दिसून आली. बीएसईचा मिडकॅप निर्देशांक 0.1 टक्क्यांच्या किरकोळ वाढीने 14,818 च्या स्तरावर बंद झाला. निफ्टीचा मिडकॅप 100 निर्देशांक वधारत बंद झाला. बीएसईचा स्मॉलकॅप निर्देशांक 0.1 टक्क्यांनी घसरत 15,654 वर बंद झाला.

बँकिंग, एमएमसीजी, धातू, भांडवली वस्तू, ऊर्जा, तेल आणि वायू समभागात जोरदार खरेदी झाली. बँक निफ्टी 1 टक्क्यांनी मजबूत होत 23,742 वर बंद झाला. निफ्टीचा पीएसयू बँक निर्देशांक 0.7 टक्के आणि खासगी बँक निर्देशांक 1 टक्क्यांनी मजबूत झाला.

निफ्टीचा एफएमसीजी निर्देशांक 0.8 टक्के आणि धातू निर्देशांक 1.75 टक्क्यांनी वधारला. बीएसईचा भांडवली वस्तू निर्देशांक 0.75 टक्के, तेल आणि वायू निर्देशांक 0.5 टक्के, ऊर्जा निर्देशांकात 0.5 टक्क्यांनी तेजी आली होती. मात्र औषध आणि स्थावर मालमत्ता निर्देशांकात विक्री दिसून आली.

दिग्गज समभागांची कामगिरी

टाटा स्टील, अदानी पोर्ट्स, हिंडाल्को, बॉश, वेदान्ता, ऍक्सिस बँक, एल ऍण्ड टी, रिलायन्स इन्डस्ट्रीज 3.5-1.5 टक्क्यांनी मजबूत झाले. इन्फोसिस, आयशर मोटर्स, बीपीसीएल, डॉ. रेड्डीज लॅब, यस बँक, सन फार्मा, टाटा मोटर्स आणि कोल इंडिया 1.1-0.6 टक्क्यांनी घसरले. मिडकॅप समभागात एनएलसी इंडिया, सन टीव्ही, पेट्रोने एलएनजी, जेएसडब्ल्यू स्टील, जीई टी ऍण्ड डी 2.9-2.1 टक्क्यांनी वधारले. स्मॉलकॅप समभागात एव्हरेस्ट इन्डस्ट्रीज, केसर टर्मिनल्स, फिलिप्स कार्बन, एमईपी इन्फ्रा आणि स्वेलेक्ट एनर्जी 20-11 टक्क्यांनी मजबूत झाले. मिडकॅप समभागात वॉकहार्ट, व्हिडिओकॉन, आयडीबीआय बँक, बायोकॉन, व्हॅवेल्स 6.8-1.8 टक्क्यांनी घसरले.

Related posts: