|Thursday, July 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » दहशतवादी हाफिज प्रकरणी सुनावणी पुढे ढकलली

दहशतवादी हाफिज प्रकरणी सुनावणी पुढे ढकलली 

लाहोर

: मुंबई हल्ल्याचा सूत्रधार आणि जमात-उद-दावाचा प्रमुख हाफिज सईद आणि त्याच्या चार साथीदारांना यंदाची ईद नजरकैदेतच साजरी करावी लागणार आहे. पाकिस्तानच्या लाहोर उच्च न्यायालयाने सोमवारी सुरू असलेल्या त्यांच्या स्थानबद्धतेसंबंधी खटल्याच्या निकालाची तारीख 3 जुलैपर्यंत पुढे ढकलली आहे. सोमवारी विधी खात्याच्या अधिकाऱयांनी सरकारची बाजू मांडणारे उप महाधिवक्ता न्यायालयात हजर नसल्याचे सांगत निकाल पुढे ढकलण्याची विनंती केली. यावर न्यायाधीश अब्दूल सामी खान यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हा निर्णय दिला. सईदसमवेत अब्दूल्ला उबैद, मलिक झफर इक्बाल, अब्दूल इक्बाल अबीद आणि काझी काशिफ हुसैन या चौघांना 1997 च्या दहशतवाद प्रतिबंधक कायद्यान्वये 30 एप्रिलपासून स्थानबद्ध करण्यात आले आहे. पाकमधील पंजाब सरकारने  देशातील शांतता आणि एकोपा भंग करणाऱया कृत्यात सहभागी झाल्याच्या आरोपाखाली ही कारवाई केली आहे.