|Sunday, November 18, 2018
You are here: Home » क्रिडा » 100 मी. शर्यतीत कॅनडाचा डी ग्रेस विजेता

100 मी. शर्यतीत कॅनडाचा डी ग्रेस विजेता 

वृत्तसंस्था/ स्टॉकहोम

 स्वीडनमध्ये रविवारी झालेल्या डायमंड लीग ऍथलेटिक्स स्पर्धेत कॅनडाच्या आंद्रे डी ग्रेसने पुरूषांची 10 मी. धावण्यांची शर्यत जिंकताना 9.69 सेकंदाचा अवधी घेतला. ग्रेसची या शर्यतीतील ही अधिक सरस कामगिरी असून येत्या ऑगस्टमध्ये  इंग्लंड येथे होणाऱया विश्व ऍथलेटिक्स स्पर्धेत जमैकाचा जगातील वेगवान धावपटू युसेन बोल्टला ग्रेसकडून कडवा प्रतिकार होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

ग्रेसने ऑलिंपिक स्पर्धेत 200 मी. धावण्याच्या शर्यतीत यापूर्वी रौप्यपदक मिळविले आहे. चालू वर्षीच्या ऍथलेटिक हंगामात ग्रेसची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. गेल्या गुरूवारी ग्रेसने ओस्लो डायमंड लीग ऍथलेटिक स्पर्धेत 100 मी. धावण्यांची शर्यत जिंकली होती. स्टॉकहोम स्पर्धेत जर्मनीच्या रेयुसने 100 मी. धावण्यांच्या शर्यतीत 9.99 सेकंदाचा अवधी घेत रौप्यपदक तर डोनोव्हॅन बेली आणि सुरिन यांनी संयुक्त तिसरे स्थान पटकाविले. पुरूषांच्या 1500 मी. धावण्यांच्या शर्यतीत केनियाच्या चेरूयॉटने 3 मिनिटे, 30.77 सेकंदाचा अवधी घेत सुवणपदक पटकाविले. या क्रीडाप्रकारात मिकोयुने रौप्यपदक व किपरॉपने कास्यपदक मिळविले. नॉर्वेच्या वॉरहोमने पुरूषांची 400 मी. अडथळय़ाची शर्यत जिंकली.

Related posts: