|Thursday, December 13, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » माजी न्यायमूर्ती कर्णन यांना अटक

माजी न्यायमूर्ती कर्णन यांना अटक 

कोइंबतूर / वृत्तसंस्था

कोलकात उच्च न्यायालयाचे माजी वादग्रस्त न्यायाधीश सी. एस. कर्णन यांना पश्चिम बंगाल पोलिसांनी अटक केली आहे. मंगळवारी त्यांना येथील एका खासगी महाविद्यालयाच्या अतिथीगृहातून अटक करण्यात आली. ते निवृत्त झाल्यानंतर एका आठवडय़ाने ही कारवाई करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाची अवमानना केल्याबद्दल त्यांना सहा महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर ते सार्वजनिक ठिकाणी दिसले नव्हते. एक ‘फरारी’ (फ्युगिटिव्ह) म्हणून निवृत्त झालेले ते पहिलेच उच्च न्यायालय न्यायाधीश ठरले आहेत.

Related posts: