|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » मौजे तासगाव येथील वेश्याव्यवसाय चालणाऱया कस्तुरी लॉजवर धाड

मौजे तासगाव येथील वेश्याव्यवसाय चालणाऱया कस्तुरी लॉजवर धाड 

प्रतिनिधी/ पेठवडगाव

 मौजे तासगाव येथे निर्जन ठिकाणी असलेल्या कस्तुरी लॉजवर आज प्रशिक्षणार्थी सहा. पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटक्के यांच्या पथकाने धाड टाकून या ठिकाणी चालणारा वेश्या व्यवसाय व बेकायदा 53 हजार रुपयांचा दारू साठा जप्त केला. याप्रकरणी लॉजमालकासह, चालक घनश्याम कांबळे (रा. कुंभोज, ता. हातकणंगले) व मॅनेजर नारायण भीमराव गीते (रा. खरवंडी कासार, ता. पाथर्डी, जि. नगर), कामगार प्रताप हापे (रा. येळापूर) तसेच एक पिडीत युवतीस ताब्यात घेतले. पिटा कायदा व बेकायदा दारू साठा केल्याप्रकरणी वडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

  याबाबत अधिक माहिती अशी की, पेठ वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे तासगाव येथून संभापूरकडे जाणार्या रस्त्यावर निर्जन ठिकाणी धनाजी पाटील (रा. मौजे तासगाव) याने लॉजिंग सुरू केले आहे. या ठिकाणी त्याने बीअर बारही होता.

  गेल्या काही महिन्यापासून हा लॉज घनश्याम धनवडे (रा. कुंभोज, ता. हातकणंगले) यास चालवावयास दिला होता. धनवडे याने या ठिकाणी मुंबई व अन्य ठिकाणाहून मुली व महिला देहविक्रीसाठी उपलब्ध केल्या असल्याची माहिती कागल पोलीस ठाण्याकडे सेवेत असलेल्या प्रशिक्षणार्थी सहा. पोलीस अधिक्षक भाग्यश्री नवटक्के यांना लागली. आज सायंकाळच्या सुमारास प्रशिक्षणार्थी सहा. पोलीस अधिक्षक नवटक्के यांनी पोलीस हवालदार रविंद्र खाडे, पो. कॉ. विठ्ठल जाधव, पो. कॉ. प्रियांका साबळे, तरन्नुम चौगुले यांचे पथक तयार करून लॉजबाहेर सापळा रचला. एका पोलीस कर्मचाऱयाला या लॉजवर बनावट ग्राहक म्हणून पाठवून सापळा रचून कारवाई केली.

  या कारवाईत या ठिकाणी असलेली एक पिडीत युवतीस ताब्यात घेतले तर या ठिकाणी बेकायदेशीरपणे ठेवलेली 53 हजार रुपये किमतीची दारूच्या बाटल्या जप्त केल्या. या कारवाईवेळी पोलीस हवालदार रविंद्र खाडे, पो.कॉ. विठ्ठल जाधव, पो.क् ाढाŸ. प्रियांका साबळे, तरन्नुम चौगुले तसेच वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव, सपोनि देशमुख, हवालदार बालाजी घोळवे, संदीप मगदूम आदीचा समावेश होता.