|Thursday, July 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » खाण खात्याकडून 18 ट्रकांवर कारवाई

खाण खात्याकडून 18 ट्रकांवर कारवाई 

प्रतिनिधी/ फोंडा

खाण खात्याने मंगळवारी केलेल्या कारवाईत बेकायदेशीररित्या रेती, चिरे व खडी वाहतूक करणारे 18 ट्रक जप्त केले. ओल्ड गोवा, म्हार्दोळ, पर्वरी, कुंकळी व फर्मागुडी या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. मागील पंधरा दिवसांत करण्यात आलेली ही चौथी कारवाई असून आत्तापर्यत 83 वाहनांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

खाण खात्याचे तांत्रिक सहाय्यक संचालक ऍन्थोनी लोपिस यांच्या मार्गदर्शनाखाली खाण खात्याच्या पथकाने ही कारवाई केली. ओल्ड गोवा येथे तीन,  म्हार्दोळ येथे एक, पर्वरी येथे सहा, कुंकळी येथे तीन व फर्मागुडी येथे पाच बेकायदेशीर वाहतूक करणारे ट्रक जप्त करण्यात आले. त्यामध्ये रेतीवाहू, खडी व चिरेवाहू ट्रकांचा समावेश आहे.

मागील आठवडय़ाभरात ही कारवाई सुरु असून आत्तापर्यंत चार वेळा विविध ठिकाणी करण्यात आलेल्या कारवाईमध्ये साधारण 83 ट्रक जप्त करण्यात आल्याची माहिती खाण खात्याकडून मिळाली आहे.

 

Related posts: