|Thursday, January 17, 2019
You are here: Home » उद्योग » नकारात्मक वैश्विक संकेताने बाजारात दुसऱया दिवशीही घसरण कायम

नकारात्मक वैश्विक संकेताने बाजारात दुसऱया दिवशीही घसरण कायम 

सेंसेक्समध्ये 14 तर निफ्टीत 19 अंकाची किरकोळ घसरण

वृत्तसंस्था/ मुंबई

पुरवठा वाढल्यामुळे कच्च्या तेलाचे दर कोसळण्याच्या भीतीने मुंबई शेअरबाजार निर्देशांकाची सुरुवात 63 अंकाच्या पडझडीने झाली. दिवसभराच्या चढ-उतारानंतर आशियाई बाजारातून मिळालेल्या नकारात्मक संकेतांमुळे दोन्ही प्रमुख निर्देशांक किरकोळ घसरणीसह बंद झाले. 

सप्ताहाच्या तिसऱया दिवशी सेंसेक्स 14 अंकांनी घसरत 31283 च्या स्तरावर बंद झाला. तर 19 अंकांची घसरण नोंदवत राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी 9637 वर स्थिरावला.  दिग्गज समभागामध्ये सुस्ती असताना स्मॉलकॅप समभागामध्ये मात्र चांगली खरेदी दिसून आली. त्यामुळे बीएसईचा स्मॉलकॅप इंडेक्स 0.1 टक्क्याच्या वृद्धीसह 15695 च्या जवळपास बंद झाला. मिडकैप समभागामध्ये आजच्या सत्रात कमजोरी दिसून आली ज्यामुळे  बीएसईचा मिडकॅप निर्देशांक 0.04 टक्क्याच्या नाममात्र वाढीसह सपाट पातळीवर बंद झाला.

आजच्या व्यवहारीक सत्रात धातू, सार्वजनिक कंपन्यांचा सीपीएसई, माहिती तंत्रज्ञान, वाहन उद्योग सारख्या क्षेत्रामध्ये विक्रेत्यांचा दबाव दिसून आला. त्यामुळे सत्राच्या शेवटी निफ्टीचा माहिती तंत्रज्ञान इंडेक्स 0.65 टक्के, ऑटो इंडेक्स 0.60 टक्के, मेटल इंडेक्स 1.2 टक्के आणि फार्मा इंडेक्स 0.26 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले. तर वित्तीय सेवा, बांधकाम आणि एफएमसीजी क्षेत्रात खरेदीचा जोर राहिल्यामुळे हे निर्देशांक कालच्या स्तरावर बंद झाले.

दिग्गज समभागांची कामगिरी

हिंदुस्तान युनिलिवर, रिलायन्स, इंडियाबुल्स हाउस्sिंाग फायनान्स, टाटा पॉवर, विप्रो, मारुती, कोटक बँक आणि सनफार्मा या कंपन्यांच्या समभागामध्ये सर्वाधिक तेजी दिसून आली. तर हिंडाल्को, ओएनजीसी, टाटा मोटर्स, अंबूजा सीमेंट, एचडीएफसी बँक, हीरो मोटोकॉर्प, यस बँक, बॉश लिमिटेड आणि गेलचे समभाग घसरले. मिडकॅपमध्ये जीएमआर इंफ्रा, जेपी असोशिएट, रिलायंस कम्युनिकेशन आणि जेएसडब्लू एनर्जीचे समभाग 6.75 ते 3.19 टक्क्यांनी वधारत बंद झाले. स्मॉलकॅप विभागातील भूषण स्टील, हेग, मोनेट इस्पात, टेक्नोक्राफ्ट इंडिया, ऍडलॅब्स चे समभाग 19.88 ते 11.16 टक्क्यांनी मजबूत झाले.

Related posts: