|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » सुहास निंबाळकर यांच्याकडून जलयोग सादर

सुहास निंबाळकर यांच्याकडून जलयोग सादर 

प्रतिनिधी/ बेळगाव

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जलयोगाची जागृती करण्यासाठी बेळगावातील नागरिकांनीही पुढाकार घेतला आणि आगळ्या पद्धतीने योग दिन साजरा केला.

येथील ज्येष्ठ नागरिक सुहास रावसाहेब निंबाळकर (वय 66) यांनी योगदिनी गोवावेस येथील रोटरी जलतरण तलावात जलयोग सादर केला. डॉल्फिन स्विमिंग गुपच्या सहकार्याने हा उपक्रम झाला. त्यांनी पद्मासनापासून शवासनापर्यंतची विविध आसने सादर केली. यासंदर्भात बोलताना त्यांनी मधुमेह आणि रक्तदाब नियंत्रणासाठी जलयोग लाभदायक ठरत असल्याचे सांगितले.

स्विमर्स क्लबतर्फेही जलयोग

शृंगेरी कॉलनी (खासबाग) येथील नेसरकर विहिरीवर स्विमर्स क्लबतर्फे जलयोग प्रात्यक्षिके सादर झाली. यावेळी श्रीधर ऊर्फ बापू जाधव यांनी ही प्रात्यक्षिके सादर केली. यावेळी महादेव पाटील, रमेश हेडा, किशोर नेसरकर, वरदराज पै, विनू नाईक, अजय शहापूरकर आदी उपस्थित होते.

Related posts: