|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » जीएसटीमुळे एसटी प्रवासी वाहतूक महागणार नाही !

जीएसटीमुळे एसटी प्रवासी वाहतूक महागणार नाही ! 

मुंबई / प्रतिनिधी

जीएसटी करप्रणालीचा नेमका परिणाम काय होणार याविषयी सर्वत्र चर्चा असताना याचा परिणाम एसटी महामंडळावर देखील दिसून येत आहे. या साऱयातून एसटीच्या तिकीट प्रणालीप्रमाणेच एसटीस होणाऱया विविध सुट्टय़ा भागांच्या पुरवठय़ावर फारसा परिणाम होणार नसल्याचा अंदाज सांगितला जात आहे. एसटीला दरवर्षी सुमारे 250 कोटी रुपये किंमतीचा विविध सुट्टय़ा भागांचा पुरवठा केला जातो. त्यावरही परिणाम होणार नसल्याचे सांगितले जाते.

एसटी महामंडळास टायरसह लोखंड, पोलाद आदी भागांची आवश्यकता असते. पण जीएसटीमुळे या किंमतीवर काही परिणाम होणार का मुद्दा उपस्थित झाला आहे. यावेळी एसटीमध्ये या वस्तूंचा समावेश जीएसटीमध्ये होणार असल्याने किंमतीत वाढ होईल, असा सूर व्यक्त केला जात आहे. पण, प्रामुख्याने तिकिटांप्रमाणेच सुट्टय़ा भागांच्या पुरवठय़ाच्या किंमतीतही फार फरक पडणार नसल्याचा दावा केला जात आहे. बसच्या चेसिससाठी आताच्या करप्रणालीत अबकारी आणि व्हॅटनुसार, सुमारे 27.60 इतका कर लागतो. जीएसटीमध्ये त्यावर 28 टक्के इतका कर लागणार असल्याने त्या किंमतीत विशेष वाढ होणार नसल्याचा युक्तिवाद केला जात आहे. एसटीला होणाऱया पुरवठय़ांतील वस्तूंच्या किंमतीवरील कराची रक्कम जीएसटीनंतरही साधारण त्याच स्तरावर राहील, असा बांधला जात आहे. त्याचवेळी यासंदर्भात एसटीच्या ज्येष्ठ अधिकाऱयांची बैठक होणार असून त्यात जीएसटी संदर्भात चर्चा केली जाणार आहे.

Related posts: