|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » पहिली मेरीट लिस्ट 95 टक्क्यांपर्यंत

पहिली मेरीट लिस्ट 95 टक्क्यांपर्यंत 

मुंबईतील नामांकित महाविद्यालयांची एफवायची पहिली मेरीट लिस्ट जाहीर

मुंबई / प्रतिनिधी

मुंबई विद्यापीठाच्या सलंग्नित मुंबईतील नामांकित महाविद्यालयाच्या पदवी अभ्यासक्रमाची पहिली गुणवत्ता यादी 95 टक्क्यांपर्यंत पोहचली. गुरुवारी संध्याकाळी सर्व महाविद्यालयांनी आपली मेरीट लिस्ट जाहीर केली. यावेळी अनेक विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला तर अनेकांना दुसऱया यादीची वाट पहावी लागणार असल्याचे चित्र होते. मुंबईतील नामांकित महाविद्यालयांची पहिली गुणवत्ता यादी आणखी वाढणार, अशी शक्यता यावेळी व्यक्त करण्यात येत होते. मात्र, तसे झाले नाही.

बारावीमध्ये पास होणाऱया विद्यार्थ्यांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. त्यामुळे महाविद्यालयांची कटऑफ वाढीव लागणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होते. मात्र, बहुतेक महाविद्यालयांनी 95 ते 80 दरम्यान आपली पहिली गुणवत्ता यादी असल्याचे जाहीर केले. मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱया पदवी अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयातील विविध अभ्यासक्रमासाठी आतापर्यंत 9 लाख 31 हजार 912 विद्यार्थ्यांची आपल्या नावाची नोंद केली. कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे 23 ते 28 जून 2017 पर्यंत सुरू राहणार आहे. एसएससी, आयसीएसई आणि सीबीएसई यांच्यासह इतर बोर्डाचे निकाल चांगले लागले असल्यामुळे यंदा पहिली मेरीट लिस्ट 98 टक्क्यांपर्यंत पोहचली. दुसरी मेरीट लिस्ट 28 जून, तिसरी आणि शेवटची मेरीट लिस्ट 1 जुलै 2017 रोजी जाहीर होईल.

रामनारायण रुईया महाविद्यालय

विज्ञान : 90 टक्के

सामान्य विज्ञान : 81 टक्के

वाणिज्य : 90 टक्के

कला : 93 टक्के (इंग्रजी) , 60 टक्के (मराठी)

के. जे. सोमैया कॉलेज सायन्स अँड कॉमर्स

बीएससी : ( बायोटेक) 83.08

बीएससी : (सीएस ) 80.15

बीकॉम : (एफएम) 77

बीकॉम : (एएफ) 89.60

बीएमएस : 90.17

बीए  : 79

बीकॉम : 90.4

एस. के. सोमैया कॉलेज ऑफ आर्ट सायन्स अँड कॉमर्स

बीए : 70

बीकॉम : 80

बीकॉम ( बीआय) : 80.62

बीकॉम ( एएफ) :  87

बीकॉम ( एफएम) : 80.92

बीएससी  (सीएस) : 67.8

व्ही. जी. वझे कॉलेज

बीएससी : 76.15

बीकॉम : 89.54

बीए : 84.77

मिठीबाई कॉलेज

बीकॉम : 90

बीए : 94.8

Related posts: