|Saturday, January 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » ‘त्या’ प्रस्तावावरून काँग्रेस, भाजपचा सभात्याग

‘त्या’ प्रस्तावावरून काँग्रेस, भाजपचा सभात्याग 

8 टक्के ऐवजी 5.39 टक्के दरवाढ लागू

काँग्रेसची प्रस्ताव रिओपानची मागणी

प्रस्ताव रिओपन ऐवजी नामंजूर

शिवसेनेचा नवीन दरवाढीस विरोध

काँग्रेस तो प्रस्ताव पुन्हा आणणार

मुंबई / प्रतिनिधी

मुंबईकरांवर दरवर्षी 8 टक्क्यांपर्यंत पाणीदरवाढ लादण्याबाबत स्थायी समितीने  2012 मध्ये आयुक्तांना तसे अधिकार दिले. आता ही 8 टक्के पाणीदरवाढ कमी करून 5.39 टक्के पाणीदरवाढ दरवर्षी लागू करण्याबाबतच्या निवेदनदर प्रस्तावाला मागील स्थायी समितीच्या बैठकित सर्वपक्षियांनी विरोध केला होता. मात्र, या पाणीदरवाढीबाबत आयुक्तांना दिलेले अधिकार काढून घेण्याबाबत विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी 2012 चा प्रस्ताव रिओपन करून आयुक्तांचे अधिकार काढून घेऊन पाणीदरवाढ रद्द करण्याची मागणी करत तसा प्रस्ताव प्रशासनाकडून आणला. परंतु, समिती अध्यक्षांनी सदर प्रस्ताव नामंजूर केला. त्यामुळे संतप्त काँग्रेस व भाजप सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत सभात्याग केला.

त्यामुळे आता प्रशासनाची 5.39 टक्के पाणीदरवाढ लागू झाली आहे. विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी समिती अध्यक्षांनी व शिवसेनेने प्रस्ताव नामंजूर करून व त्यावर चर्चा करू न देणे म्हणजे लोकशाहीचा गळा घोटला आहे, असा आरोप केला आहे. वास्तविक शिवसेनेने वचननाम्यात 24 तास पाणी देण्याचे व कोणतीही करवाढ वा दरवाढ न करण्याचे आश्वासन दिले होते. आता ही पाणी दरवाढ मुंबईकरांवर का लादत आहेत असा सवाल करत पाणीदरवाढीबाबतचा  2012 ला मंजूर केलेला प्रस्ताव आता पुन्हा रिओपन करणारच, असे रवी राजा यांनी सांगितले.

भाजप गटनेते मनोज कोटक यांनी समिती अध्यक्षांनी प्रस्ताव भले नांमजूर केला असता तरी त्यांची मर्जी पण किमान प्रस्तावार चर्चा तरी व्हायला हवी होती, असे सांगत प्रस्ताव नामंजुरीचे खापर अध्यक्ष व शिवसेनेवर फोडले. समाजवादीचे गटनेते रईस शेख म्हणाले, 2012 मध्ये आम्ही नवीन होतो म्हणूनच आम्ही अजाणतेने त्यावेळी पाणीदरवाढीचा व आयुक्तांना त्याबाबतचे अधिकार बहार करण्याचा

प्रस्ताव मंजूर करून चूक केली. पण आता हा प्रस्ताव रिओपन करून आयुक्तांचे अधिकार काढून घेता आले असते. पण ती संधी आता गेली.

शिवसेनचे पाणीदरवाढ करवाढीस विरोध : सभागृहनेते

शिवसेनेचा मुंबईकरांवर कोणतीही करवाढ दरवाढ लादण्यास विरोधच आहे. परंतु, विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी सदर प्रस्ताव रिओपन करण्याबाबत सभागृहनेता व सर्वपक्षीय गटनेते यांना विश्वासात घेतले नाही. त्यामुळेच विरोध पक्षनेता व भाजपवर ही नामुष्की ओढवली असे सभागृहनेते यशवंत जाधव म्हणाले. पाणीदरवाढीचा प्रस्ताव हा 2012 लाच भाजपचे गटनेते मनोज कोटक, सपा गटनेते रईस शेख आदींनीच मंजूर केला होता. आता नव्याने पाणीदरवाढ केलेली नाही. पाणीदरवाढ, करवाढीला शिवसेनेचा विरोधच राहिल, असे यशवंत जाधव यांनी सांगितले.

Related posts: