|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » अमेय नाईक व विन्सी क्वाद्रूस यांना साहित्य अकादमी पुरस्कार

अमेय नाईक व विन्सी क्वाद्रूस यांना साहित्य अकादमी पुरस्कार 

प्रतिनिधी /मडगाव :

साहित्य अकादमी तर्फे देण्यात येणाऱया युवा पुरस्कारांसाठी कोकणी विभागात गोव्याच्या अमेय विश्राम नाईक यांच्या ‘मोग डॉट कॉम’ या कविता संग्रहाला तर बाल साहित्य पुरस्कारसाठी विन्सी क्वाद्रूस यांच्या ‘जादुचें पेटूल’ या कथासंग्रहाला पुरस्कार प्राप्त झाला आहे. या पुरस्कारांचे स्वरूप तांब्याचे पदक व रोख रू. 50 हजार असून दिल्लीत होणाऱया विशेष कार्यक्रमात त्याचे वितरण होणार आहे.

अमेय नाईक हे गोव्यातील युवा साहित्यिक असून कोकणी चळवळीत ते सक्रीय आहेत. त्यांची अन्य काही पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. राय येथील विन्सी क्वाद्रूस यांनी कोकणी भाषा मंडळ तसेच इतर संघटनांवर कार्य केले आहे. त्यांचे कविता संग्रह तसेच कथा संग्रह प्रसिद्ध झालेले आहेत.

अमेय नाईक व विन्सी क्वाद्रूस यांना साहित्य अकादमीचे पुरस्कार झाल्याने, त्याचे कोकणी चळवळीत ज्येष्ठ व तज्ञांकडून अभिनंदन होत आहे. कोकणी भाशा मंडळ यांनी देखील दोघांचेही अभिनंदन केले आहे.

कोकणी युवा साहित्य पुरस्कारचे परीक्षण कोकणी कवी परेश कामत, कला व संस्कृती खात्याचे संचालक प्रसाद लोलयेकर व ज्येष्ठ साहित्यिक ऍड. उदय भेंब्रे यांनी केले होते तर बाल साहित्य पुरस्कारचे परीक्षण लोककलाच्या अभ्यासक तसेच कोकणी कवियत्री डॉ. जयंती नाईक, डॉ. एल. सुनिथा बाय व शिक्षण तज्ञ प्रो. नारायण देसाई यांनी केले होते.