|Sunday, August 19, 2018
You are here: Home » Top News » इस्रोची झेप, एकाचवेळी 31 उपग्रहांचे प्रक्षेपण

इस्रोची झेप, एकाचवेळी 31 उपग्रहांचे प्रक्षेपण 

ऑनलाईन टीम / श्रीहरीकोटा  :

आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटामधून इस्त्रोने पीएसएलव्ही – सी 38 यानाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. या माध्यमातून इस्रोने कार्टोसेट-2 मालिकेतील उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. पृथ्वीवरील घडामोडींकडे लक्ष ठेवण्यात कार्टोसेट -2 मालिकेतील उपग्रह महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. कार्टोसेट – 2 मालिकेतील उपग्रहासोबतच आणखी 30 उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले.

कार्टोसेट-2 मालिकेतील उपग्रहामुळे भारताला सीमावर्ती भागात आणि शेजारी देशांवर नजर ठेवता येणार आहे. यासोबतच स्मार्ट सिटी योजनेतील विविध उपक्रमांसाठी कार्टोसेट-2 मालिकेतील उपग्रहाची भारताला मोठी मदत होणार आहे. या उपग्रहामुळे 500 किलोमीटर अंतरावरून सीमावर्ती भागात नेमकी किती शत्रू सैन्य आणि किती रणगाडे तैनात आहेत, याची माहिती मिळू शकणार आहे.

 

Related posts: