|Thursday, July 19, 2018
You are here: Home » Top News » पाक लष्कराच्या हल्ल्यात महाराष्ट्राचे दोन जवान शहीद

पाक लष्कराच्या हल्ल्यात महाराष्ट्राचे दोन जवान शहीद 

ऑनलाईन टीम / जम्मू काश्मीर :

पाकिस्तानी लष्कराच्या बॉर्डर ऍक्शन टीमने नियंत्रण रेषेवर पुन्हा एकदा भ्याड हल्ला केला आहे. या हल्ल्यात महाराष्ट्राचे दोन जवान शहीद झाले आहेत.

औरंगाबादचे रहिवासी असलेले नाईक संदीप जाधव आणि कोल्हापुरचे रहिवासी असलेले शिपाई श्रावण बाळकू माने हल्ल्यात शहीद झाले. 35 वर्षीय संदीप जाधव गेली 15 वर्ष लष्कराच्या सेवेत होते. तर 25 वर्षीय माने 4 वर्षापूर्वीच सेवेत रूजू झाले होते. जम्मूमधील पुंछ विभागात पाकिस्तानी लष्कराच्या ‘बॅट’तुकडीने हा हल्ला केला. भारतीय लष्कराने प्रत्युत्तर केलेल्या हल्ल्यात बॅटचा एक सैनिक ठार झाला, तर एक सैनिक जखमी झाला. गुरूवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास जम्मूमधील पुंछ विभागात बॅटच्या टीमते नियंत्रण रेषेच्या आत सुमारे 600मीटरपर्यंत घुसखोरी केली. पाकिस्तानी लष्कराने गोळीबार करत त्यांना संरक्षण दिले.

 

 

Related posts: