|Friday, October 19, 2018
You are here: Home » Top News » मुख्यमंत्री फडणवीस-शरद पवार यांच्यात कर्जमाफीवरुन चर्चा

मुख्यमंत्री फडणवीस-शरद पवार यांच्यात कर्जमाफीवरुन चर्चा 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीच्या मुद्यावरुन दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये कर्जमाफीशिवाय विविध विषयांवर चर्चा झाली.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे उपस्थित होते. कर्जमाफीचा लाभ राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱयांना कसा मिळेल, यासाठी आम्ही नेत्यांची भेटीगाठी घेत आहोत. यासाठी यापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. तसेच विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचीही भेटी झाल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

त्यानंतर आज शरद पवार यांची भेट घेतली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचीदेखील आज भेट घेणार असल्याचे पाटील म्हणाले.

Related posts: