|Saturday, April 20, 2019
You are here: Home » विविधा » विठू नामाच्या गजरात सायकल वारी पंढरपूरकडे

विठू नामाच्या गजरात सायकल वारी पंढरपूरकडे 

ऑनलाईन टीम / नाशिक :

विठू नामाचा गजरात नाशिकमधून आज शेकडो वारकरी चक्क सायकलवरून पंढपूरला रवाना झाले. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सायकल वारकरी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत.

वारीला साहित्य, संस्कृती, अध्यात्माची परंपरा जरी असली, तरी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ही सायकलवारी आयोजित केली जाते. सायकल वारीमध्ये पोलीस अधिकारी, उद्योजक, डॉक्टर यांयचसोबत वयोवृद्ध आणि महिलांचाही समावेश आहे. यंदा या वारीत सायकलींचे रिंगण अनुभवायला मिळणार असून, अशा प्रकारचे हे पहिले रिंगण होणार आहे. नाशिक ते पंढरपूर हा सुमारे 350 किमीचा प्रवास हे वारकरी 3 दिवसात पूर्ण करणार आहे. वारीचा मार्ग हा नाशिक, सिन्नर, नगर पासून पुढे टेंभूर्णी ते पंढरपूर असा असेल.

 

Related posts: