|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » योगिता बेटक्याळे बी.ए. पदवी परिक्षेत विद्यापीठात 10 वी

योगिता बेटक्याळे बी.ए. पदवी परिक्षेत विद्यापीठात 10 वी 

प्रतिनिधी/ जयसिंगपूर

येथील श्रीमती गंगाबाई खिवराज घोडावत कन्या महाविद्यालयाची अर्थशास्त्र विभागाकडील विद्यार्थी योगिता पुंडलिक बेटक्याळे हिने शिवाजी विद्यापीठाच्या मार्च 2017 मध्ये झालेल्या बी.ए. पदवी परिक्षेत विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत 10 वा क्रमांक पटकाविला.

शाळेच्यावतीने प्राचार्य डॉ. जी. जे. फगरे यांनी योगिता बेटक्याळेचा सत्कार केला. अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डी.डी. मंडपे, प्रा. के. एस. शेलार, प्रा. डॉ. एस. के. रावळ यांचे मार्गदर्शन लाभले.