|Monday, November 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » केबल ऑपरेटरच्या विरोधात जिल्हाधिकाऱयांची ट्रायकडे तक्रार

केबल ऑपरेटरच्या विरोधात जिल्हाधिकाऱयांची ट्रायकडे तक्रार 

प्रतिनिधी/ पणजी

उत्तर गोव्यातील केबल सेवा त्वरित सुरु करण्याचे आदेश उत्तर गोवा जिल्हाधिकारी नीला मोहनन यांनी शुक्रवारी हुबळी येथील भीमा रीड्डी डिजिटल सेवा कंपनीचे गोवा व्यावस्थापक राजेश जुवारकर यांना दिला. सायं. 4 वाजेपर्यंत केबल सेवा सुरु व्हायला हवी, असे त्यांनी सूचित केले. यावेळी उत्तर गोव्यातील केबल ऑपरेटर यांची उपस्थिती होती. मात्र या आदेशाची पुर्तता न झाल्याने जिल्हाधिकाऱयानी भीमा रीड्डी डिजिटल सेवा कंपनीविरुद्ध ट्राय या अधिकारीणीकडे तक्रार केली आहे.

उत्तर गोव्यात गेले चार दिवस केबल सेवा बंद आहे. गोव्यातील ऑपरेटरकडून पैसे मिळत नसल्याचा दावा हुबळीतील कंपनीकडून करण्यात येत आहे. जुवारकर यांनीही या मुद्यावर बोट ठेवले होते. पण यावेळी ऑपरेटरनी आपली बाजू मांडताना सांगितले की, 90 टक्के ऑपरेटर पैसे भरतात तर काही ऑपरेटर भरत नाहीत. त्यांना नोटीस बजावावी. पण अशा पद्धतीने अचानक कोणतेही कारण न देता केबल सेवा बंद करणे योग्य नव्हे.

केबल बंदमुळे ग्राहकांत नाराजी

जानेवारी ते जूनपर्यंत केबल सेवा व्यवस्थित सुरु होती. पण चार दिवसाअगोदर कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक केबल सेवा बंद करण्यात आली. चार दिवस सेवा बंद राहिल्याने ग्राहकांत नाराजी निर्माण झाली आहे. ग्राहक व ऑपरेटर यांचे वाद होत आहेत. वारंवार फोन करून ग्राहक सतावत आहेत, असे केबल ऑपरेटरनी सांगितले.

याप्रकरणी सविस्तर चर्चा केल्यानंतर जिल्हाधिकारी नीला मोहनन यांनी कंपनी व्यवस्थापक जुवारकर यांना शुक्रवारी सायं. 4 वा. पर्यंत केबल सेवा सुरु व्हायला हवी, असे आदेश दिले. अन्यथा काळय़ा यादीत टाकण्यात येणार असल्याचाही त्यांनी इशारा दिला.

Related posts: