|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » Top News » पाकिस्तानमध्ये दुहेरी बॉम्बस्फोट, 62जण ठार

पाकिस्तानमध्ये दुहेरी बॉम्बस्फोट, 62जण ठार 

ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :

दोन वेगवेगळय़ा ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटामुळे पाकिस्तान हादरले आहे. या दान्ही बॉम्बस्फोटात 62जणांचा मृत्यू, तर 100 पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. हे दोन्ही बॉम्बस्फोट शिया बहुल भागात झाल्याची माहिती आहे.

पश्चिम पाकिस्तानातील परचिनार शहरात झालेल्या दुहेरी बॉम्बस्फोटात 15 जण ठार झाले असून 70 पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. तर काल सकाळी क्वेट्टा शहरात झालेल्या स्फोटात 11 जण ठार झाले होते. हे दोन्ही स्फोट बाजारपेठेत झाले असून त्यावेळी इफ्तारसाठी लोक खरेदी करत होते. मृत पावलेल्यांमध्ये 3 पोलीस अधिकाऱयांचा समावेश आहे. तर कराचीमध्य दहशतवाद आणि पोलिसांमध्ये चकमक झाली.

 

Related posts: