|Friday, July 19, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » ऑनलाईन शॉपिंग साईट्सवर ऑफर्सचा धमाका

ऑनलाईन शॉपिंग साईट्सवर ऑफर्सचा धमाका 

ऑनलाईन टीम / मुंबई :

आजपासून ऑनलाइन शॉपिंग साईट्सवर धमाकेदार ऑफर्स देण्यात येणार आहे. अमेझॉन, मिंत्रा, फ्लिपकार्ट, स्नॅपडीलवर 50 ते 80 टक्क्यांपर्यंत बंपर सेल जाहीर करण्यात आला आहे.

अमेझॉनवर 23 ते 25 जून, मिंत्रावर 24 ते 26 जून, स्नॅपडीलवर आज आणि उद्या हा सेल सुरू राहणार आहे. त्यामुळे शॉपिंग लव्हर्सकरता ही एक पर्वणीच ठरणार आहे. दरम्यान, काही साईट्सवर आगदी 80टक्क्यांपर्यंत सेल आहे, दुसरीकडे अमेझॉन काही दिवसांपूर्वी स्मार्टफोन सेल सुरू केला होता.यामध्ये मोटोरोला, वनप्लस, ऍपल, सॅमसंग आणि इतर ब्रॅण्डेड स्मार्टफोनवर जबरदस्त सूट देण्यात आली होती.