|Thursday, January 17, 2019
You are here: Home » Top News » ‘आप’च्या 21 आमदारांचे होणार निलंबन ?

‘आप’च्या 21 आमदारांचे होणार निलंबन ? 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

लाभाच्या पदासंदर्भातील (ऑफिस ऑफ प्रॉफिट) आम आदमी पक्षाच्या 21 आमदारांवर खटला चालवण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले. या 21 आमदारांची विधीमंडळाचे सदस्यत्त्व रद्द केले जाणार असल्याची माहिती आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने आम आदमी पक्षाच्या 21 आमदारांना मंत्र्यांचे संसदीय सचिव बनवण्याची घोषणा करुन अध्यादेश जारी केला होता. याप्रकरणी दाखल करण्यात आलेला खटला रद्द करण्यात यावा, अशी मागणी आम आदमी पक्षाच्या आमदारांनी केली होती. त्यांची ही मागणी आज निवडणूक आयोगाने फेटाळून लावली. त्यामुळे हा आम आदमी पक्षाला मोठा धक्का मानला जातो.

Related posts: