|Thursday, December 13, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » लालूपुत्र तेजप्रताप यादवने राजद कार्यकर्त्यालाच झोडपले

लालूपुत्र तेजप्रताप यादवने राजद कार्यकर्त्यालाच झोडपले 

पाटणा

 राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीत. कन्या मीसा भारती बेनामी मालमत्तेच्या प्रकरणात अडकल्यानंतर आता पुत्र आणि बिहारचे आरोग्यमंत्री तेजप्रतापवर आपल्याच्या पक्षाच्या कार्यकर्त्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हस्तक ठरवून मारहाण करण्याचा आरोप झाला आहे.

राजद कार्यकर्ता सनोज यादव यांनी तेजप्रतापवर हा आरोप केला आहे. आपल्याला इफ्तार पार्टीत बोलाविण्यात आले होते, तेथेच तेजप्रतापने आपल्याला मारहाण केल्याचे सनोज यादवने म्हटले आहे. अखेर असे का झाले हेच मला समजले नाही. मी अनेक वर्षांपासून समर्पणाच्या भावनेसह लालू यादव यांच्यासाठी काम करत आहे. तेजप्रताप यांना देखील मी खूप आधीपासून ओळखतो. परंतु मी जेव्हा इफ्तार पार्टीत गेलो, तेव्हा त्यांनी अचानक मला बाहेर काढत संघाचा हस्तक संबोधू लागले. तेजप्रतापने आपल्याला जीवे मारण्याची धमकी देखील दिल्याचा दावा यादवने केला आहे.

Related posts: