|Monday, March 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » संसदेचे पावसाळी अधिवेशन 17 जुलैपासून

संसदेचे पावसाळी अधिवेशन 17 जुलैपासून 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

संसदेचे पावसाळी अधिवेशन 17 जुलैपासून सुरु होणार असल्याची माहिती संसदीय कामकाज समितीच्यावतीने देण्यात आली आहे. 11 ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. 17 जुलै रोजीच राष्ट्रपती पदासाठी मतदानही होणार आहे. या समितीच्या अध्यक्षपदी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह होते. दरम्यान, पहिल्या दिवशीचे कामकाज दिवंगत खासदार विनोद खन्ना आणि राज्यसभा सदस्या पल्लवी रेड्डी यांना आदरांजली वाहून स्थगित करण्यात येण्याची शक्यता आहे. या अधिवेशनामध्ये जीएसटी अंमलबजावणी आणि त्याच्या परिणामाबाबत चर्चा होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Related posts: